नवीन लेखन...

अंपायर डेव्हिड शेफर्ड

इंग्लंडचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेले अंपायर डेव्हिड शेफर्ड यांचा जन्म २७ डिसेंबर १९४० रोजी झाला.

लठ्ठ शरीरयष्टीमुळे व आपल्या विशिष्ट लकबींमुळे क्रिकेट रसिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेले इंग्लंडचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट अंपायर डेव्हिड शेफर्ड यांनी ९२ कसोटी आणि १७२ वनडे सामन्यांत अंपायरिंग केले. सहा वर्ल्डकपमध्ये पंचगिरी करणारे ते पहिले अंपायर ठरले. तीन वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत त्यांनी अंपायर म्हणून काम पाहिले. एखाद्या संघाची धावसंख्या १११, २२२ किंवा ३३३ अशी ‘ट्रिपल नेल्सन’ म्हणवल्या जाणा-या तिहेरी समान आकडय़ांवर पोहोचल्यावर शेफर्ड अस्वस्थ व्हायचे. कारण अशा धावसंख्येवर त्या संघाची एखादी विकेट पडेल, अशी भीती किंवा अंधश्रद्धा शेफर्ड यांना सतावू लागायची. त्यावर ‘तोडगा’ म्हणून जमिनीवर एकच पाय ठेवणे उत्तम अशी त्यांच्या भाबड्या मनाची धारणा असायची. या परिस्थितीत ते एक पाय वर घेतायेत किंवा टुणकन उडी मारतायेत असे मजेशीर दृश्य दिसायचे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी शेफर्ड यांना मिळाली नाही. मात्र ग्लुस्टरशायरकडून त्यांनी २८२ डोमेस्टिक लढतीत १०,६७२ धावा फटकवल्या आहेत. दोन दशकांहूनही अधिक काळ पंच म्हणून जबाबदारी सांभाळत अनेक क्रिकेटरसिकांच्या मनात शेफर्ड यांनी अढळ स्थान मिळविले. भरदार शरीरयष्टीच्या शेफर्ड यांनी १९८३ ते २००५ या एका तपाच्या कारकिर्दीत ९२ कसोट्या अन १७२ एकदिवसीय सामन्यात पंच म्हणून काम पहिले. याशिवाय तब्बल १४ वर्षे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ग्लूस्टरशायरचे प्रतिनिधित्वही केले.

त्यांच्या कारकिर्दीतल्या आकडेवारीपेक्षा इतर शैलींमुळेच ते चाहत्यांच्या मनात घर करून बसले आहेत. नेहमी हसतमुख चेहरा असलेल्या जाडजूड शरीरयष्टीच्या शेफर्ड यांची ‘टुणूक उडी’ भलतीच लोकप्रिय झाली होती. ‘नेल्सन’ म्हणजे १११, २२२, ३३३, या पटीतील धावसंख्या धावफलकावर झळकली कि त्यांनी ‘टुणूक उडी’ मारलीच म्हणून समजा. हा क्षण टिपण्यासाठी दूरचित्रवाणी वाहिन्यांचे कमेरे आणि प्रेक्षकांच्या नजरांचा रोख त्यांच्या दिशेने वळायचा. त्यांच्या मैदानावरच्या विविध लकबी क्रीडारसिकांना खूप आवडायच्या. मधूनच एका पायावर उभे राहणेही असेच. मैदानावर असताना गैरवर्तनाबद्दल त्यांनी कोणाला तंबी दिल्याचे आठवत नाही. पण पंचगिरीवरच्या त्यांच्या अढळ निष्ठेमुळे म्हणा किंवा क्रिकेटच्या सखोल ज्ञानामुळे क्रिकेटपटूवर त्यांचा चांगलाच दरारा होता.

‘मी कधीही अयोग्य निर्णय दिलेले नाहीत’ असे सतत ठणकावून सांगणाऱ्या शेफर्ड यांच्याकडून एकदा मात्र चूक झाली. २००१ मध्ये इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानच्या कसोटी सामन्यात त्यांना सकलेन मुश्ताकच्या एकाच षटकातील तीन खराब चेंडू ओळखता आले नाहीत. यातल्या दोन चेंडूवर सकलेनने दोन गाडी बाद केल्याने पाकिस्तानला त्याचा फायदा झाला. सामना संपल्यानंतर आपले चुकले हे शेफर्ड यांच्या लक्षात आले. रामशाश्री प्रभूणेंचा बाणा दाखवत त्यांनी मोठेपणाने आपली चूक तर काबुल केलीच पण प्रायश्चित्त म्हणून थेट निवृत्तीही जाहीर केली होती. परंतु खेळाडूंनी अन अधिकाऱ्यांनी विनंती केल्याने नंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. खिलाडूवृत्तीचा हा एकच नमुना नव्हता, अशा अनेक घटनांमुळे ते क्रिकेटपटूनच्या आदरास पात्र ठरले.

तणावात राहून पंचगिरी करण्यापेक्षा ती एक कला म्हणून विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळेच तंत्रज्ञानपूर्वीच्या काळातील त्यांची कारकीर्द खर्या अर्थाने गाजली. त्यांच्यावरील आयसीसीच्या भरवशामुळेच १९९६, १९९९ आणि २००३ अशा सलग तीन विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंच म्हणून काम पाहण्याची संधी त्यांना मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या निपक्षपाती समितीचे पहिले पंच म्हणून ‘ब्रिटीश एम्पायर ऑर्डर’चा बहुमानही त्यांना मिळाला.

डेव्हिड शेफर्ड यांचे २७ ऑक्टोबर २००९ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..