नसण्यातुनि तुझ्या, स्मरती तव अस्तत्वाच्या खुणा ।
वाटे, सुरम्य सहवासांतील तव, क्षण एकहीन होउणा,
क्षण एकहीन होउणा ।।
असतां मी जवळी, नाही विचारलेस, सखे, तूं मजसी कदा ।
समीप असतां दोघे, कळे ना, मजसी दुर्लक्षण्याची अदा,
मजसी दुर्लक्षण्याची अदा ।।१।।
याद येतां तुझी, कुरवाळीतो, बंध रेशमी, मृदु-भावनांचे ।
स्मृती-गंधातल्या मोहिनीतुनी, विणतो जाळे संमोहनाचे,विणतो जाळे संमोहनाचे ।।
अनाकलनीय गौडबंगाल, मजसवे वागण्याच्या तंत्राचे ।।
मनोमनीं मग्न मी, झोपण्या उपाय अचूकह्या मंत्राचे,
झोपण्या उपाय अचूकह्या मंत्राचे ।।२।।
वादातूनि सदा, उद्भभवे सारखेच, वाद निर्विवाद ।
नाही घेतले बोल मनावर, केला न कधी मी प्रतिवाद,
केला न कधी मी प्रतिवाद ।।
असूनि अचूक, घेतले मी पडते, दिला सादेस प्रतिसाद ।
तरीही, लोटलेस दूर मजसी, नसता जराही मम प्रमाद,
नसता जराही मम प्रमाद ।।३।।
स्मरते तोर्यातल्या मस्तीतली, चाल तव झोकदार
झणीं, आठवतो मज, तुझ्या बोचर्या शब्दांचा भडीमार,तुझ्या बोचर्या शब्दांचा भडीमार ।।
सहवासांतल्या तव, अनुभविले जरी मी, शब्दांचे निखारे ।
परी हृदयांतुनि, येती भरभरुनि, आकंठ प्रीतीचे उमाळे,
आकंठ प्रीतीचे उमाळे ।।४।।
भावनाशून्य वागण्यांतुनि तुझिया, झालो चित्ती मी बेजार ।
नाईलाज माझा, नेत्रपल्लवतिव, मनांस भावते अपार,मनांस भावते अपार ।।
मंजुहस्यातुनि तुझिया, उचंबळे हृदयीं, प्रीती-सागर ।
परी सारतास दूर, छेडितो हृदयीं अति विरहांची सितार,अति विरहांची सितार ।।५।।
बेदरकार वृत्तीतुनितव, अंतरीं नितमाजते बेदिली ।
समजावुनि घेण्यास मज, नाही घेतलीस तूं, जराही तसदी,
नाही घेतलीस तूं, जराही तसदी ।।
कळे न मज, प्रिये कां करितसे, असा अवसाण घात ।
प्रेमभरे, हृदयांतल्या प्रीतीतुनि, धरिता मी तुझा हात,
धरिता मी तुझा हात ।।६।।
स्मितावुनि गूढ तुझिया, जाणवते मज, हृदयींची बोच ।
वागण्यातुनि आज्ञाया, न कळे मज, तव हृदयींची खोच,
तव मनींची खोच ।।
छदमी पणांतुनि जरी बांधला, मज छळण्याचा चंग ।
अजाणता, वागण्यातुनि अशा, होतो आपुल्याच प्रीतीचा भंग,
होतो आपुल्याच प्रीतीचा भंग ।।७।।
असतां समीप मी, करितसे पदोंपदीं तूं मानखंडना ।
देखुनि तरलतव लावण्यते देखणे, विसरतो माझी वंचना,
विसरतो माझी वंचना ।।
नसता अपराध माझा, चालूच असते शब्दांतुनि झोडणे ।
विसरतेसधुंदीत सदा, मजसवे प्रीतीबंधांचे जोडणे,
मजसवे प्रीतीबंधांचे जोडणे ।।८।।
अवेळी साधुनि वेळ, बरे नव्हे टाळणे मज प्रीतीच्या वाटेवरी ।
प्रिये, जाण सत्य, मीच आहे, तव मोहमयी अदेचा वाटेकरी ।।
तव मोहमयी अदेचा वाटेकरी ।।
धुंदी तव यौ वनाच्या मस्तीची, करिते मजसदा बेहोश ।
तुजवीण जगणे न जगणे, म्हणुनि साजतो सारा तुझा हैदोस,
साजतो सारा तुझा हैदोस ।।९।।
उन्मत्त वृत्तीतुनि तव, जरी मारल्यास मज तूं ठोकरा ।
लावण्यातुनि तुझिया, गांधितो मनीं तव यौवनाचा मोगरा,
तव यौवनाचा मोगरा ।।
बेदर्दी पणांतुनि तुझ्या, दर्दही हृदयींचा झाला सर्द ।
न जाणूनि प्रतिरंग, माझ्या मनींचे, लेटतेस दूर तूं स्वर्ग,
लेटतेस दूर तूं स्वर्ग ।।१०।।
-गुरुदास / सुरेश नाईक
२२ ऑक्टोबर २०१०
कोजागिरी पौर्णिमा,
मुलुंड (पू) मुंबई ४०००८१
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply