नवीन लेखन...

वसंतोत्सवात नादब्रह्माचा अविस्मरणीय आविष्कार

राजस्थानचा खडा स्वर, मोहनवीणेचा झंकार; कमायचा, खडताल, तबल्याचे “फ्युजन’ आणि हरिहरन यांचे गझलगायन… नादब्रह्माचा असा अविस्मरणीय आविष्कार शुक्रवारी पुण्यात वसंतोत्सवात रसिकांनी अनुभवला.

या उत्सवास आजपासून प्रारंभ झाला. जगप्रसिद्ध मोहनवीणावादक विश्‍वमोहन भट, वसंतराव देशपांडे यांचे चिरंजीव अजित देशपांडे, नातू राहुल देशपांडे यांच्या हस्ते या उत्सवाचे उद्‌घाटन झाले. पहिल्या सत्रात रंग भरला विश्‍वमोहन भट, राजस्थानी लोकसंगीत सादर करणारे गायक अन्वर खान, बरकतखान, खडतालवादक गाजी खान, कमायचावादक दरेखॉं मांगणीयार आणि तबलावादक विजय घाटे यांनी!

या कलाकारांनी शास्त्रीय संगीत आणि राजस्थानी लोकसंगीताच्या “फ्युजन’ची अनोखी पर्वणी संगीतरसिकांना दिली. मोहनवीणा-खडताल, तबला-ढोलक, कमायचा-मोहनवीणेची जुगलबंदी. त्याला प्रेक्षकांची भरभरून दाद… यातून वसंतोत्सवाचे पहिले पुष्प बहरत गेले. अन्वर खान यांनी सुरवातीला विश्‍वमोहन भट यांच्या साथीने राजस्थानी मांड-केसरिया बालम पेश केला. नंतर तिलककामोद रागावर आधारित केरव्यातील “झिरमिर बरसे मेघ’ आणि किरवाणीतील “हिचकी’ सादर केली. “हे लो मारे सुनोजी रामा’ या भजनाने त्यांनी पहिल्या सत्राचा समारोप केला. रात्री हरिहरन यांचे बहारदार गझलगायन झाले. गालिबची “दायम पडा हुआ’, तसेच “वो दिल नवाज है’, “पत्ता पत्ता बुता बुता’ आदी गझल त्यांनी सादर केल्या.

— स्नेहा जैन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..