अर्थमंत्री अरुण जेटली उद्या बुधवारी म्हणजेच १ फेब्रुवारी २०१७ रोजी रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पाबरोबर सादर करणार आहेत. ९३ वर्षात प्रथमच रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जाणार नाही. १९२४ मध्ये ब्रिटीश काळापासून २०१६ पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे साजरा केला जात होता. तसेच प्रथमच सर्वसाधारण अर्थसंकल्प २८ किंवा २९ फेब्रुवारीऐवजी १ फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. यावेळी प्रथमच तो फ्रेबुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होत आहे. २००० पर्यंत अर्थसंकल्प सायंकाळी ५ वाजता सादर होत असे. पण वाजपेयी सरकारच्या काळात २००१ मध्ये मा.यशवंत सिन्हा यांनी ह्यात बदल केला आणि अर्थसंकल्प ११ वाजता सादर होऊ लागला.
१९२४ पासून सर्वसाधारण अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यातील अखेरीस सादर झालेला आहे. स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत एकूण ३६ अर्थमंत्री झाले. पण काही अर्थमंत्र्यांनी दोन-दोन, तीन-तीन टर्म अर्थमंत्रीपद भुषविल्यामुळे त्या पदावर बसलेल्या व्यक्तींचा हिशेब केल्यास विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली हे २६ वे अर्थमंत्री आहेत. अर्थसंकल्पाला अर्थशास्त्राचे ज्ञान हवे किंवा तो अर्थशास्त्रातील जाणकार हवा असा कोणताही नियम भारतीय राज्य घटनेत नाही. विद्यमान अर्थमंत्री हे कायदेपंडित आहेत. पण देशाला यापूर्वी अर्थशास्त्रातील जाणकार अर्थमंत्री मिळालेले आहेत.
अर्थसंकल्प म्हणजे काय ?
बजेट शब्दाची सुरूवात ही फ्रेंच बॉजेट शब्दापासून झाली. याचा अर्थ चामड्याची पिशवी असा आहे. अजूनही आपल्या देशाचे अर्थमंत्री चामड्याची बॅग हातात घेऊन अर्थसंकल्प सादर करण्याकरिता लोकसभेत प्रवेश करतात. बजेट शब्द प्रचलित होण्याचा एक छान किस्सा आहे. इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल यांच्याशी निगडीत हा किस्सा आहे. १७३३ मध्ये अर्थसंकल्प सादर करण्यासाठी वालपोल संसदेत आले होते. येताना त्यांनी एक चामड्याची पिशवी आपल्यासोबत आणली होती. त्यांनी बजेट सादरही केले, परंतु यानंतर काही दिवसांनी त्यांची चेष्टा करण्यासाठी ‘बजेट इज ओपन’ या नावाने एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली व त्यानंतर ‘बजेट’ हा शब्द प्रचलित झाला. यात केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून वर्षभराच्या खर्चाचा हिशेब संसदेत मांडण्यात येतो त्यालाच अर्थसंकल्प म्हटले जाते. यात सर्व खात्यांची माहिती, मंजूर करण्यात येणाऱ्या योजना तसेच १ एप्रिलपासून पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंतच्या सर्वच आर्थिक गोष्टींचा लेखाजोखा या अर्थसंकल्पात सादर करण्यात येत असतो. तसेच यात सरकारकडून नवीन योजनांची माहिती देण्यात येते आणि त्याच्यावर संसदेतून अप्रत्यक्षपणे मंजूरी देखील मिळावी हा याचा हेतु असतो. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अर्थमंत्री टॅक्स, ड्युटीज आणि व्याज आकारत सरकारी तिजोरीत रक्कम आणण्याचा प्रयत्न करत असतात.
संकलन संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply