नवीन लेखन...

उपनयन विधी

नुकतीच मैत्रिणीच्या मुलाची मुंज झाली. आपण केवढा प्रचंड खर्च केला हे ती मोठ्या कौतुकानं सांगत होती. देण्याघेण्याच्या साड्या, घरच्या लोकांचे उंची कपडे, व्हिडिओ कॅसेट… खर्चाच्या अशा असंख्य वाटा… याला पर्याय म्हणून दुसरी मैत्रीण सांगत होती ‘छे! माझा असल्या विधींवर विश्वासच नाही!’ आणि मी विचार करू लागले. जुन्या काळानुसार आठवं वर्ष हे मुलाचं विद्यार्जन सुरू करण्याचं वर्ष. या विद्यार्जनाची सुरुवात मुंज किंवा उपनयन संस्काराने होई. वेदकाळात जेव्हा ब्राह्मणांबरोबर क्षत्रिय, वैश्य मुलं आणि स्त्रियांनाही विद्यार्जनाचा अधिकार होता, तेव्हा केवळ या साऱ्यांवर हा संस्कार व्हायचा. हा संस्कार म्हणजे दुसरं – तिसरं काही नाही, तर विद्यार्थिदशेत मुलानं कसं वागावं याचा केलेला उपदेश आहे.

वयाच्या आठव्या वर्षांपासून पुढे बारा वर्षे म्हणजे वीस वर्षांपर्यंतचा काळ धरला, तर याच काळात पौंगडावस्था, तारुण्याचा ऐन उमलता काळ येतो. स्वत:च्या पुरुषत्वाची/ स्त्रीत्वाची जाणीव देणारा, मन सैरभैर करणारा हा काळ. पण नेमका हाच काळ कर्तृत्वाचाही. म्हणूनच भलत्या विषयांच्या आहारी न जाता सारं लक्ष विद्यार्जनाकडे लागावं, पुढील आयुष्यातील यशाचा पाया या काळात भक्कम व्हावा म्हणून उपनयन संस्कार संयमाची शिकवण देतो. कमरेला लावलेली ‘लंगोटी’ इंद्रियदमन शिकवते. शरीर सुंदर दिसावं असा मोह होऊ नये – नुसत्या नटण्या – मुरडण्याकडे लक्ष दिलं जाऊ नये म्हणून डोक्यावर सुंदर दिसणारे केस कापून टाकले जातात.

श्यामनं एकदा आपल्या आईला विचारलं होतं, ‘केसात कसला आलाय

धर्म? ते कापले काय? … वाढले काय? ” तेव्हा त्याच्या आईनं त्याला हेच उत्तर दिलं होतं.

‘धर्मांचा संबंध केसांशी नाही… त्या केसांमुळे आपण सुंदर दिसावं असा मोह निर्माण होतो. विद्येवरची नजर वारंवार आरशाकडे जाऊ लागते. हा मोह दूर सारणं म्हणजे धर्म !’ इतक्या साध्या विधीचा इतका खोल अर्थ आज आई-वडिलांना

तरी माहीत असतो का?

आईचं मन मुलाच्या बालपणातच अडकून पडलेलं असतं. त्याचे हट्ट पुरवावेत, त्याला आपल्या जवळ ठेवावं. ही तिच्या वात्सल्याची भूक असते. पण सतत सावलीत राहिलेलं झाड वाढू शकत नाही. तसंच आईचं अतिप्रेम मुलाला ‘बुळा’, ‘कर्तृत्वहीन’ करू शकतं. म्हणूनच मातृभोजनातून आईला जाणीव करून दिली जाते – बस्स ! आता हे शेवटचं. इथून पुढे मुलानं स्वावलंबी बनायला हवं.

स्वतःची कामं त्याला स्वत:ला करता यायला हवीत. तरच त्याचा खरा विकास होईल. होमाच्या अग्नीवर स्वतःचा भात स्वतः शिजवून खाणं हे या स्वावलंबनाचं प्रतीक ! –

आणि आईनं आपल्या मायेच्या पाशातून त्याला थोडं मोकळं केलं, की वडिलांनी त्याला दीक्षा द्यायची ती तेजाच्या उपासनेची. या संस्कारात वडील मुलाचे गुरु होतात. त्याला गायत्री मंत्राचा उपदेश करतात. गायत्रीमंत्रामुळे बुद्धिमत्ता, प्रज्ञा यांचा विकास होतो, बुद्धी स्थिर होते हे आता सिद्ध झालेलं आहे. पण ज्यानं दुसऱ्याला उपदेश करायचा, तो स्वतः त्यासाठी पात्र हवा. म्हणून मुलाला उपदेश करण्यापूर्वी वडिलांनी स्वतः गायत्री मंत्राची, तेजाची उपासना करावी हे चिड अभिप्रेत असतं.

असतापातर चिलम आजच्या काळानुसार विचार केला, तर वडिलांचाच आदर्श मुला

असतो. त्यांचं रोजचं वागणं, बोलणं, स्वतःच्या कार्यक्षेत्राशी त्यांची निष्ठा आणि त्यांचे चारित्र्य मुलं पाहात असतात. ज्या आदर्शाची मुलांना शिकवण द्यायची तो आदर्श प्रथम पित्यामध्ये हवा ही अपेक्षा अगदी योग्यच नाही का?

डिल-प्रांत

– प्र आता मुलाचा संबंध त्याच्या गुरूंशी येणार असतो. त्यांच्याकडून ज्ञान मिळवायचं, ते नम्रतेनं. त्यांच्याबद्दल मनामध्ये पूर्ण आदर बाळगून, ज्ञान मिळविण्यासाठी स्वतःकडे कितीही हीनपणा आला तरी तो स्वीकारण्याची तयारी हवी. प्रसंगी Pri

गुरूची सेवाही करायला हवी. (अर्थात हे सारं खऱ्या ‘ज्ञानासाठी’ ‘मार्कासाठी’ गुरुची सेवा करणं आणि शिष्याकडून सेवा करून घेऊन उत्तरपत्रिकेवर ‘मार्क्स’ वाढवणं ही आमची संस्कृती नाही) तर मुलाचे पहिले गुरु त्याचे वडील, त्यांना नमस्कार करून, प्रतीक म्हणून पाय चेपून गुरूशी कसं वागावं याची शिकवण दिली जाते.

सरस्वतीच्या दरबारात सगळे सारखे असतात. तुमची सामाजिक पत, स्थिती यांचा तिच्याशी संबंध नाही. विद्येच्या प्रांगणात ‘विद्यार्थी’ हा एकमेव दर्जा. म्हणूनच श्रीमंत राजाचा मुलगा असला, तरी कृष्णाला लाकडं गोळा करून आणायला सांगताना संदिपनी कचरले नाहीत. मुंजीमध्ये भिक्षा मागून पहिल्यांदा हा संस्कार घ्यायचा. अर्थात यामध्ये या ‘माधुकरी’ च्या निमित्तानं मुलांनी घरोघरी जावं आणि समाजस्थितीचा अभ्यास करावा हीदेखील अपेक्षा होती.

इतक्या साऱ्या अर्थानी परिपूर्ण असलेला हा विधी आहे. हा एक संस्कार आहे. मुलांनी दुपारी झोपून आळसात दिवस घालवू नये. उंची वस्त्रे गाद्या गिर्खा, पक्वान्ने या साऱ्या उपभोगातून मन काढून टाकून ते विद्येच्या प्राप्तीसाठी एकाग्र करावे. त्याचबरोबर सूर्योपासना करून, व्यायाम, सूर्यनमस्कार घालून शरीर बळकट करावं. ते नटवण्यापेक्षा पुढच्या आव्हानांना तोंड द्यायला समर्थ करावं हे सारं मुंजीमध्ये शिकवलं जातं.

पण एका व्रतस्थ आयुष्याची ही सुरुवात आपण कशी करतो? भरजरी

कपडे आणि दागदागिन्यांचे प्रदर्शन करून ! आहेर, परत आहेर करून ! जेवणावळी घालून !

किंवा छे! जुनाट कसल्यातरी निरर्थक गोष्टी सगळ्या अशी संभावना करून !

प्रत्यक्षात मुंज म्हणजे व्रतबंध. आता विद्यार्जनाच्या सद्गुण प्राप्त करून घेण्याच्या एका व्रतानं तू बांधला गेला आहेस याची शिकवण मुलाला देणं, व्रतबंध एकदा करून चालत नाही. आजच्या मोहमयी, झगमगत्या जगात शाळा-कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आपल्या मुलाला-मुलीला त्याच्या व्रताची पदोपदी आठवण करून द्यावी लागते ‘बाबारे, हे दिवस नुसते मौजमजा करण्याचे नाहीत. काहीतरी C

मिळवण्याचेसुद्धा आहेत.’

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..