श्रावण सुरू झाला की, उपवास सुरू होतात आणि उपवास सुरू झाले की, उपवासाचे विविध पदार्थ शोधले जातात. नेहमीच साबुदाणा खिचडी अथवा वरीचा भात खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी वेगळा, चटपटीत उपवासाच पदार्थ ताटात आल्यावर उपवासाचा देखील आनंद घेता येतो.
उपवासाची खांडवी करण्यासाठी दोन वाटय़ा वरीचे तांदूळ, तीन वाटय़ा गूळ, एक वाटी नारळाचा चव, छोटा आल्याचा तुकडा, चिमूटभर मिठ, चिमूटभर केशर, अर्धी वाटी तूप, खांडवी सजावटीसाठी काजू, बदाम चारोळ्या याचाही उपयोग करता येतो.
खांडवी करण्याची कृती सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे असते. प्रथम वरीचे तांदूळ कोरडे भाजून घ्यावे. स्वच्छ धुवून घ्यावेत. तूप गरम करून त्यात टाकावे. आले, नारळाचा चव वाटून तो शिजवायला ठेवावा. त्यात चिमूटभर मिठ, वेलदोडा, केशर टाकावे. वरीचे तांदूळ शिजल्यावर ते परातीत मोकळे करून पसरवून ठेवावे. गुळाचा पाक करून त्यात एक चमचा तूप घालावे. त्यात मोकळे केलेले तांदूळ घालून ते परतून घ्यावे. घट्ट झाले की, तूप लावून त्यावर तो गोळा करून थापावा. जाड वडय़ा पाडाव्यात. सजावटीसाठी काजू, चारोळ्या, बदामाचे काप लावून सजवावेत. गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून त्यावर थापल्या तरी छान दिसतात. आणि लागतातही चवदार.
नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ म्हणून उपवासाची मजा घेता येऊ शकते.
Leave a Reply