नवीन लेखन...

ख्यातनाम उर्दू शायर आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित शहरयार

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आँवला गावात जन्मलेल्या अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार यांच्या कुटुंबात लष्करी सेवेची परंपरा होती. त्यांचा जन्म १६ जून १९३६ रोजी झाला. त्याचे वडिल पोलीस अधिकारी होते. त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. त्यामुळे त्याच्या प्राथमिक शिक्षणाचे काही दिवस वडिलांची पोस्टिंग असलेल्या ठिकाणी झालं. त्यानंतर हरदोईमध्ये काही वर्षे घातल्यानंतर त्यांना १९४८ मध्ये अलीगढला पाठवण्यात आलं. त्यावेळी त्यांना तिथल्या सरकारी शाळेत प्रवेश मिळाला नाही. म्हणून त्यांना सिटी स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागला. आजवरचं त्याचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं होतं, मात्र सरकारी शाळेत प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांना उर्दू माध्यमातून शिकावं लागलं. त्यानंतर शालेय शिक्षण पूर्ण करून ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठात पोहचले. त्यानंतर ते अलिगड मुस्लीम विद्यापीठात उर्दूचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथेच ते उर्दूचे विभागप्रमुख म्हणून सेवा निवृत्त झाले. जेव्हा उर्दू साहित्यात नवतेची आणि आधुनिकतेची लाट आली होती, त्याच काळात शहरयार यांनी उर्दू साहित्यलेखनात प्रवेश केला. त्यांचे अनेक समकालीन काळाच्या ओघात बाजूला पडले, पण शहरयार यांनी नव्या पिढीलाही आपल्या शायरीची भुरळ घातली. १९६५ साली शहरयार यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाने त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले होते. त्यातील ‘सीने में जलन आँखों में तूफान सा क्यूँ है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूँ है’ सारख्या गझलेने अली सरदार जाफरी यांच्यासारख्या शायराकडून पोचपावती मिळाली. अर्थात ही गझल पुढे ‘गमन’ चित्रपटातून भारतभर पोचली. पुढच्या टप्प्यात त्यांचे आणखी संग्रह आले. ‘ख्वाब के द्वार बंद है’ सारख्या संग्रहाने नव्याने त्यांच्याकडे लक्ष गेले. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘उमराव जान’ चित्रपटातील गझलांनी त्यांना दर्दी चित्रपटप्रेमींच्या हृदयापर्यंत पोचवले. उमराव जान या चित्रपटासाठी त्यांनी लिहीलेल्या ‘दिल चीज क्या है आप मेरी…’, ‘यह क्या जगह है दोस्तो’, ‘इन आँखो की मस्ती में’ या गझला आजरामर ठरल्या. त्यांनी बॉलीवूडमध्ये गमन, अंजुमन यासह अनेक चित्रपटांसाठी गीतलेखन केले. त्यांच्या अभिजात दर्जामुळे चित्रपट गीतेही चिरस्मरणीय ठरली. ख्वाब का दर बंद है या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८७ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांचे इस्मे आजम, सातवाँ दर आणि हिज्र के मौसम हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. २००८ साली ख्वाब के दर बंद है या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले मा. शहरयार यांचे निधन १३ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..