कधी – कधी असं होतं की आपल्या समोर उभी असलेली व्यक्ती आपल्याशी बोलण्यासाठी तोंड उघडते तर तिचे तोंड उघडताक्षणी तिच्या तोंडातून दुर्गंधीचा एक तीव्र दर्प आपल्या श्वासांना भिडतो आणि आपण हैराण होता. अशा वेळी आपण मोठ्या संकटात सापडता कारण त्या समोरच्या व्यक्तीला तिच्या तोंडातून येणाया दुर्गंधी बद्दल सांगूही शकत नाही आणि तिच्या तोंडातून येणाया घाण दर्पाला सहनही करू शकत नाही. लोकांना याबद्दल असे वाटते की उन्हाळ्याचे दिवस असल्याने श्वासातून घाण दर्प निघण्याची समस्या होते, परंतु हे खरे कारण नाही. कोणताही ऋतु असेल तरी ही समस्या उद्भवू शकते.
श्वासांच्या दुर्गंधी ची अनेक कारणे असू शकतात. जसे – पचन क्रियेत बिघाड झाल्याने, दात कुजल्याने, पोटात काही गडबड झाल्याने, तोंडात किंवा हिरड्यात कोणत्याही प्रकारचे संसर्ग झाल्याने.
जर संतुलित आहार असलेले जेवण केले, कॅल्शियम, प्रोटीनयुक्त खाद्य पदार्थ आणि मिनरल्स आदींचे योग्य सेवन केले तर आपल्यासमोर ही दातांची समस्या उद्भवू शकत नाही. योग्य आहाराच्या सेवनाने आपण सहजरीत्या दातांच्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकतो.
पाणी खूप प्यावे
जर आपण योग्य प्रमाणात पाणी पितो तर कधीही रोग ग्रस्त होणार नाही. पाणी पिण्याने आपल्याला बरेच फायदे होतात. त्यात एक फायदा हा आहे की पाणी आपल्या तोंडाची स्वच्छता करण्यात मदत करतो. पाणी तोंडाच्या आत क्लींजरचे काम करतो. त्यामुळे तोंडाचा घाण वास दूर होतो. संपूर्ण दिवस आपण काही तरी खात असतो, त्यामुळे आपल्या तोंडात पूर्वीपासूनच जे बॅक्टीरिया असतात, ते बॅक्टीरिया आपल्या हिरड्या आणि दातांवर प्रहार करीत असतात. आपण कमी पाणी पिण्याने आपल्या तोंडात निर्माण होणाया लाळेमध्ये अशा बॅक्टीरियाचे प्रमाण खूप वाढते, जे आपल्या दातांचे शत्रू असतात. त्यामुळे आपल्या तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. अशा वेळी वारंवार पाणी पिण्याने तोंडाच्या दुर्गंधीतून बर्याच प्रमाणात मुक्ती मिळविता येते. त्याचबरोबर जेव्हा आपणास वाटेल की तोंडातून घाण वास येत आहे तर पाण्याने चूळ भरून घ्यावी. असे केल्याने तोंडातून बॅक्टीरियायुक्त लाळ बाहेर निघून जाते.
दह्याचे सेवन करावे
अनेक संशोधनांनी हे सिद्ध झाले आहे की दही खाण्यानेही आपल्या तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळू शकते. दह्यात बॅक्टीरिया उत्पन्न होतात, परंतु हे असे बॅक्टीरिया असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेकारक आहेत. दह्याचे सेवन केल्याने श्वासांच्या घाण दर्पापासून सुटका होऊ शकते. दह्यामुळे असे कसे होते, याबाबत वैज्ञानिक जास्त माहिती मिळवू शकलेले नाहीत. खरंतर तेल व मैद्याने बनलेले चिप्स, बिस्कीट आदी स्नेक्सच्या सेवनापेक्षा ताज्या दह्याच्या सेवनाने जास्त फायदा मिळू शकतो.
संत्री खावी
संत्री व्हिटॅमिन ‘सी’चे मुख्य स्रोत असते. याच्या सेवनाने आपली त्वचा सुंदर आणि कांतीवानच होत नाही तर याच्या सेवनाने श्वासांच्या घाण दर्पापासूनही सुटका होऊ शकतो. संत्री खाण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते आपल्या तोंडात उपस्थित बॅक्टीरियाला लढा देण्यासाठी मुख्य भूमिका निभावते. संत्र्याव्यतिरिक्त व्हिटॅमिन सी’ युक्त इतर फळांच्या सेवनानेही आपण श्वासांच्या दुर्गंधी पासून मुक्ती मिळवू शकतो. टॉमेटो, लिंबू, द्राक्षाच्या सेवनाने आपण श्वासातील घाण दर्प घालवू शकता.
बडी शोप खावी
जेवण झाल्यावर जर थोडीशी बडी शोप खाल्ली तर चांगले होईल. त्याने एक तर जेवणाचे पचन होते, त्याचबरोबर श्वासांची दुर्गंध घालविण्यात मदत करते. बडी शोप दोन भाग करून एक भाग थोडा भाजून घ्यावा. आता दोन्ही भाग एकत्र करावे. ही शोप दररोज जेवण झाल्यावर खावी. असे केल्याने आपण श्वासाच्या दुर्गंधी पासून मुक्ती मिळवू शकता.
लहान वेलची खावी
हिरव्या वेलचीत अँटीसेप्टिक गुण असतात. त्याच्या सुवासिक चवीमुळे आपल्याला दुसर्यांसमोर लाजिरवाणे होणार नाही. या वेलचीला तोंडात ठेवून हळूहळू चावून त्याचा रस चोखत राहावे.
लवंग सेवन करावे.
लवंगाचे जे ऍरोमेटिक फ्लेवर असते, ते तोंडाची दुर्गंध दूर करते. त्यामुळे जेवणात त्याचे वापर अवश्य करा.
दालचीनीचे सेवन करा
दालचीनीची गोड चव भाज्यांना चवीष्ट तर करतेच, त्याचबरोबर यात जे अँटीसेप्टिक गुण असतात त्यामुळे आपल्या तोंडात उत्पन्न होणारे बॅक्टीरिया नष्ट होतात त्यामुळे आपल्याला श्वासांच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply