नवीन लेखन...

उशीर कशाला करता, उद्याचे काम आजच करा आणि यशस्वी व्हा !!!

जर एखादे काम आजच करावयाचे असेल, तर ते उद्यावर कशाला टाकता. ते उद्यावर ढकलू नका. तुम्हीच तुम्हाला आव्हान दिल्यास, तुमच्यातील आळशीपणा दूर पळेल. त्यासाठी तुम्ही तुम्हालाच आव्हान द्या.

दिरंगाई हा शब्द तुम्हाला माहित आहे काय? आपण कितीही पध्दतशीर असलो, तरीही हा आपल्या जीवनात हळू-हळू प्रवेश करीतच

असतो. आपण जे काही हळू-हळू मिळविलेले असते, त्याची घडी तो बिघडवून टाकतो आणि जेथे काही करावेसे वाटत नाही, अशा ठिकाणीच तो अचानक आघात करीत असतो. जी शक्ती तुम्ही जमविलेली असते, ती खर्चली जाते. याचा परिणाम म्हणून आपण पूढे वाटचाल करू शकत नाही. तुम्हाला अपयश आल्यासारखे वाटते आणि असे जर तुम्हाला वाटू लागले, म्हणजे तुम्ही दिरंगाईच्या स्थितीत आहात असे समजावे.

असे का घडते? हे समजावून घेणे फार आवश्यक आहे. तरच तुम्ही ते थांबवू शकाल. हे मोठ्या प्रमाणात असू शकते. जीवनामध्ये सगळ्यात सोपी गोष्ट जर कोणती असेल, तर ती म्हणजे आळशीपणा होय किंवा एखाद्या गोष्टीपासून आपले लक्ष विचलित होणे होय. यासाठी प्रथमत: गळणारा नळ थांबविला पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वत: कार्यरत रहा. नुसतेच कार्यरत राहू नका, तर तुम्ही अविरत कार्यरत रहा. कर्तव्य किंवा कार्य हीच विश्रांती समजा.

कधी कधी काम पुन: पुन्हा केल्यामुळे त्रासदायक वाटू लागेल. परंतू हे लक्षात ठेवा की आपल्या जीवनातील सगळी कामे हि उत्साह वर्धक असतीलच असे नाही, तर काही क्षण हे कंटाळवाणे देखील असू शकतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या मनाची समजूत घाला की हि तुमच्या जीवनातील तुमचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी केलेली तुमची गुंतवणूक आहे.

तुमच्या आयुष्यातील दिरंगाईबरोबर जर का तुम्हाला लढाई करावयाची असेल, तर तुम्ही तुम्हालाच वेळोवेळी आव्हाने द्या. त्यामुळे कंटाळा जाईल आणि तुमच्यात त्या स्फूर्तीदायक शक्तीचे संचारण होईल. त्यासाठी तुम्हाला जोखीमही उठवावी लागेल. त्यासाठी तुम्ही शूरपणाने ती जोखीम आपल्या अंगावर घ्या. आजपर्यंत ज्यांनी कोणी आपली साम्राज्ये स्थापन केलीत, ती त्यांनी आपल्या सुखावह स्थितीत निश्चितच स्थापन केलेली नाहीत. तर ती त्यांनी आपल्या प्रतिकूल स्थितीवर मात करूनच निर्माण केलीत. इतकेच काय, साम्राज्ये सोडाच, तर ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यात आपले नाव कमावले ते त्यांनी स्वत: प्रतिकूल परिस्थितीवर मात करूनच मिळविले. त्यासाठी त्यांना वेळोवेळी झगडावे लागले. अनेक संकटाना सामोरे जावे लागले. आणि मगच ते नावारूपाला आलेत.

म्हणूनच उद्यावर कोणते काम सोडू नका. जे आजच करता येईल, ते आजच किंवा आत्ता करा. आपण ते जर कां उद्यावर सोडलेत, तरच दिरंगाईला आपल्या जीवनात वाव मिळेल व तो मिळतो देखील, कारण आपण आजचे काम उद्यावर टाकून ते देतच असतो.

हि दिरंगाई कशामुळे होत असते? तर आपल्या मनातील एका कप्प्यात असलेल्या भीतीमुळे किंवा अपयशाच्या कल्पनेमुळे आपण ती करीत असतो. “आपण ते करू शकणार नाही” किंवा “आपला अपमान होईल” किंवा “लोक आपल्याला हसतील” किंवा “लोक आपल्याला वेड्यात काढतील” किंवा “मला यश मिळणारच नाही” किंवा “मी अपयशीच होईन” किंवा मला हे जमणारच नाही” या भीतीपोटीच आपण ते कार्य करण्यास घाबरत असतो. तुमच्या मनातील शंका आणि तुमच्यातील आत्मविश्वासाची असलेली उणीव तुम्हाला हे करण्यास प्रवृत्त करीत असते. आणि तुम्ही समजत असता की हाच तुमचा संरक्षणात्मक पवित्रा आहे.

एकदा का उशीर झाला की तुम्ही तुमचे कार्य करण्याचे टाळत जाता. याचे कारण, एखाद्या नियोजित वेळेत ते तुमच्याकडून होईल असे तुम्हाला वाटत नाही. यावर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्यातील व्यवस्थापकाचा ताबा घ्या. तुम्हाला काय करायचे आहे, ते लिहून काढा किंवा एखादी “कार्य नोंद वही” तुमच्याजवळ ठेवा. त्यासाठी लागणारा वेळ, तुम्ही देवू शकणारा वेळ, इत्यादींची त्यामध्ये नोंद करून ठेवा. अग्रक्रमानुसार नोंद घ्या व तुमचा कामाचा अग्रक्रम ठरवा. तुम्हाला हे लिहून काढण्यासाठी त्याची मदत होईल. थोडीशी स्वयंशिस्त मात्र पाळा.

अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या या नविन अवतारात लोकांनी पाहिल्यावर, तुम्हाला तुमचा बहुमान झाल्यासारखे वाटेल. तुमच्या नकळतच ते नवल घडेल. हे साध्य होण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राला किंवा जवळच्या सहका-याला तुमच्यावर नजर ठेवण्यास सांगा. प्रत्येक दिवशी तुम्ही तुमच्या – “आज करावयाचे काम” – या नोंद वहीची दखल घ्या, ती रोजच्या रोज चाळून पहा. त्यामुळे कालचे काम, आजवर तर नाही ना ढकलले गेले आहे याची जाणीव सतत तुम्हाला होत राहील. जर तुम्ही तसे घडू दिलेत, तर ती तुमची दिरंगाई झाली असे समजा. विजयी वीर असे करीत नाहीत. आणि म्हणूनच आजचे काम आत्ता करा.

यासाठी पुढील मार्गाचा अवलंब आपल्या जीवनात करावयास शिका…………..

विश्वासाने जीवनात कर, यशाला वश ………! कर्तृवानेच मिळव यश ………..!!! पक्का ठेव तू तुझ्या मनाचा विश्वास ………..! फक्त विजयाचा मनात धार तू ध्यास ………….!!!

— मयुर तोंडवळकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..