आपण सर्वच जण वाळा ह्या वनस्पतीला ओळखतो.पुर्वीच्या काळी राजे महाराजे ह्यांना वाळ्याच्या पंख्यानी वारा घालत असत. तसेच वाळ्याचे सरबत हे देखील बऱ्याच जणांना आवडते.चला तर आता ह्या वाळ्याची आपण पुर्ण ओळख करून घेऊयात.
वाळ्याचे तृणमूल असून काण्ड १-१.५ मी उंच व सुगंधी असते.ह्याची बेटं असतात.ह्याची पाने २५-५० सेंमी लांब व १ सेंमी रूंद असतात.हि सरळ असून वरच्या भागात गुळगुळीत व पृष्ठ भागी रोमश असतात.फुलाचा देठ १०-३ सेंमी लांब असून मुळ सुगंधी असते ते वाळल्यावर सुगंध वाढतो.
ह्याचे उपयुक्तांग मुळ असून वाळा चवीला कडू,गोड व थंड गुणाचा व हल्का आणी रूक्ष असतो.हा कफपित्तनाशक व वातकर अाहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)त्वचारोग व अतिघाम येणे ह्यात वाळ्याचा लेप करतात.
२)वाळा अतिसारात आमपाचक म्हणून चांगले कार्य करतो.
३)वाळा तापामध्ये देण्यात येणाऱ्या षडंगोदकात वापरतात.
४)वाळा दाहनाशक असल्याने दाहात साखरे सह वापरतात.
५)वाळा मुत्रल असल्याने मुत्रदाह व लघ्वीच्या त्रासात तांदुळाचे धुवण व साखरे सह वापरतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply