मी मलाच अनेक वेळा प्रश्र केला “मी कोण आहे”? बरेच आढेवेढे घेऊन त्याने उत्तर दिले ‘अरे तुच तो तु स्वतः ओळखले नाहिये का तुला तुच . नाही ना मी आपला मीच…. माझं नाव भास्कर म्हणजे मी भास्कर……. नाही नाही ते तर येथे मिळालेलं विषेशनाम आहे. कैद्यांना जसा बक्कल नंबर देतांत तसा… हं….!! मग मी कोण, मी प्रत्येक वेळी वेगळा असतो. पुजा करतांना भक्त होतो. मग काय देवा बरोबर मस्त गप्पा मारत त्यांना अंघोळ घालतो…… थंड पाण्याने… बाळकृष्ण कुडकुडत असतो…… डोंन्ट वरी देवा मी आहेना म्हणत लगेच कोरड्या वस्त्रांने झाक पुसुन कोरडे करतो थंडी गायब…….मग नैवेद्य लोणीसाखरे चा तोंडाला लावतो देवाच्या. देव आ करतो घास घेतो की भास असतो माझा……काही कळतच नाही. .. .. अरे पण तो देव आहे तु कोण? पुन्हा गाडी त्याच रुळावर….. मी कोण.. अंहंम ब्रह्मा …. छे ते कसे शक्य आहे.. पृथ्वी तलावर जन्माला आल्या पासुन मरे पर्यंत जगणारा एक प्राणी… मग माझा उपयोग काय या सृष्टीच्या प्रचंड घडय़ाळाचे एक चक्र.. अदखलपात्र “पात्र” च ना मी एक.
मी काय परत देतो आहे या जन्माच्या बदल्यात.
अगोदर चा प्रश्र मात्र कायमचा ठाण मांडलेला मी कोण??? चाणक्याने शोध घेतला होता का मी कोण..याचा की बिरबलने उत्तर दिले होते मी कोण याचे………. जरी त्यांनी उत्तरे शोधली असतील पण ती त्यांच्या पुरतीच ना. मी मी माझे काय मलाच शोधायचे आहे मी कोण ते.. हा प्रश्न कायमचा माझ्या पाठगुळी बसला आहे सिंदबादच्या सफरीतील चिवट म्हातारी सारखा.
गुगल वर शोधु या उत्तर……. नको प्रचंड नवे प्रश्न व जाहिरातीत आपणच आपला” मी” पणा हारवायचो…….. एक उत्तर तर सापडले मी म्हणजे “मीपणा “याचे पैलु मात्र शोधून काढले पाहिजेत बकुळफुलाच्या झाडाखाली……
— भास्कर पवार
@©पुणे चौदा डिसेंबर २०२०
Leave a Reply