अगं नाच नाच राधे, सत्यम् शिवम् सुंदरा, कुणीतरी येणार येणार ग, उठा उठा हो सकळीक ” अशा असंख्य गाण्यांना आपल्या आवाजाने सरताज चढविणाऱ्या मराठी पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांचा जन्म ४ नोव्हेंबर रोजी झाला.
उत्तरा केळकर यांचे शास्त्रीय संगीताचे गुरू पं. फिरोज दस्तूर. व गाण्याचे गुरू श्रीकांतजी ठाकरे. ‘सत्यम शिवम सुंदरा’, ‘भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली’ असो, की बहिणाबाईंची – ‘माझी माय सरसोती’, ‘अरे संसार संसार’, ‘खोप्यामध्ये खोपा’ अशी असंख्य मराठी गाणी उत्तरा केळकर यांची गाजली. ज्या गाण्यांनी काही वर्षांपूर्वी गणेशोत्सव गाजवला आणि आज इतक्या वर्षांनंतरही ते गाणे ऐकू येते ते म्हणजे ‘अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्याची ग’ हे गाणे गायिका उत्तरा केळकर यांनीच गायले आहे. उत्तरा केळकर यांचे ‘बिलनशी नागिन निघाली, नागोबा डुलायला लागला’ हे गाणेही लोकप्रिय आहे. शास्त्रीय गायनाबरोबरच सुगम संगीत आणि लोकगीतातही आपली छाप पाडणाऱ्या उत्तरा केळकर यांनी छाप पाडली आहे.
हिंदी चित्रपटात त्या जास्ती गायल्या नाहीत, २०-२२ चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली. बप्पी लाहिरी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आनंद-मिलिंद, राम-लक्ष्मण व काही इतर संगीतकारांकडेही हिंदी चित्रपटांसाठी गाण्याची संधी त्यांना मिळाली. १९८४ ते १९९८ पर्यंत त्या बप्पी लाहिरी यांच्या कार्यक्रमांत गात असत. टारझन, डान्स डान्स, सौ करोड, घर घर की कहानी, माँ कसम,अधिकार,काली गंगा,इन्सानियत के देवता अशा चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. फूल बने अंगारे, मधील गाणं ‘गोरी कबसे हुई जवान’ हे गाणं लतादीदींना वेळ नव्हता म्हणून त्यांनी शूटिंगपुरतं गायलं, पण त्यांचे हे गाणं चित्रपटाचे निर्माते के. सी. बोकाडिया यांना आवडलं त्यांनी गाणं चित्रपटात ठेवावं, म्हणून बप्पीजींना विनंती केली. पण बप्पीजींनी लतादीदींना शब्द दिला होता. म्हणून मग गाणं चित्रपटात नाही राहिलं, पण के. सी. बोकाडिया यांनी उत्तरा केळकर यांनी गायलेलं गाणं ‘फूल बने अंगारे’ चित्रपटाच्या रेडिओ पब्लिसिटीसाठी वापरलं. त्याखेरीज त्यांनी उरिया, बंगाली तेलगू चित्रपटात काही गाणी गायली आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply