नवीन लेखन...

उत्तरायण

आर्त घालिता साद, मनापासुनिया निसर्गराणीला,
होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमल भाव-भावनांचा ।।धृ।।

लाल होऊनि किल्ला, होता झेलित, हल्ल्या हल्ल्याला ।
राजघाटीं, शांती होती वंदित, अजोड अभंग अहिंसेला ।।
गौर जनांचा गेट इंडिया, होता करीत , मुजरा मानाचा ।
कमाल मंदिरीं विराजे, नि:शब्द शांती ध्यास चिंतनाचा ।।
वेळी अशा या  होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमल भाव-भावनांचा ।।१।।

धामीं अक्षर, लीन सारे, वंदन पावन स्वामी चरणाला ।
नयन तोषिले, फिटले पारणे, नमन मंगल शिल्पाला ।।
हृदय स्पंदले, नयनही भिजले, प्रभाव स्वामी ओडाचा ।
तारणहरी, कंठनील तो, झाला स्वामी आमुच्या हृदयाचा ।।
वेळी अशा या, होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमाल भाव-भावनांचा ।।२।।

स्वर्ण-मंदिरीं, ग्रंथ साहिबां दावी सनमार्ग जगताला ।
तळ हातीं शीर घेऊनि, जाय अवघे, तापर लढण्याला ।।
बाग नव्हे ती जालियानवाला, तो तर, नरमेध शार्दूलांचा ।
रक्त वाळले, परि ऐकू येतो, धि:कार क्रूर डायरचा ।।
वेळी अशा या होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमल भाव-भावनांचा ।।३।।

वाघा येथे भिडली सीमा, अपुल्या जुन्याच शत्रू सीमेला ।
सीमेवरती सीमा नव्हती, जवानांचा असीम शौर्याला ।।
त्वेषा-त्वेषाने, केला जयजयकार भारत मातेचा ।
सलाम करुनि देशप्रेम, घेतला निरोप, बॉर्डर वाघाचा ।।
वेळी अशा या होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमल भाव भावनांचा ।।४।।

नव्हता गढ चण्डी येथे, परि, मान आगळा शहराला ।
रेखिव शहरीं, भेट दिली, नीटस् पाषाण बागेला ।।
कुरुक्षेत्री, पार्थे टेकला, उपदेश अपुल्या सारथ्याचा ।
झालो नतमस्तक, मान ठेविला, शर-पंजरी भीष्माचा ।।
वेळी अशा या होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमल भाव भावनांचा ।।५।।

मंद झाला सूर आमुचा, दिली दाद गार मसूरीला ।
शांतचित्ती, रोप चेतुनि, वंदिले, केदार-बद्रीनाथाला ।।
निलांत सुंदर तो नयनमनोहर, प्रपात केमरीचा ।
शब्दहीन त्या वातावरणीं, सृदयी नादगुंजला ब्रम्हाचा ।।
वेळी अशा या होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमल भाव भावनांचा ।।६।।

ऋषीकेशाच्या सम्यदर्शनी, मनमयूर नाचू लागला ।
राम-रामभाऊच्या झुल्यांवरुनि, वंदिले गंगा मातेला ।।
देहचि अवघा चक्षु असता, घेण्या आस्वाद निसर्गाचा ।
शमली तहान-भूक, पडला विसर देहाचा ।।
वेळी अशा या होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमल भाव भावनांचा ।।७।।

मनीं वंदिले, पुण्य भूमीला, हरिद्वाराच्या हरिपौडीला ।
थोर तपस्वी गेले होऊनि, ठेवुनि साथी गंगा मातेला ।।
टाळ-मृदुंगी कंठखअने घुमला, नाऽद गंगा स्तवनाचा ।
हृदयकोंदणी ठसुनि ाहिला, हा कल्लोळ चिदानंदाचा ।।
वेळी अशा या होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमल भाव भावनांचा ।।४।।

-गुरुदास / सुरेश नाईक
१६ फेब्रुवारी २००६
मुंबई ४०००८१

— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Avatar
About सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास 43 Articles
श्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..