नवीन लेखन...

मराठीतील ज्येष्ठ कवी प्रा. विनायक महादेव उर्फ वि. म. कुलकर्णी

प्राथमिक शिक्षणानंतर ते पुणे येथील एस. पी. कॉलेजातून बी. ए. प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झाले. पुढचे एम.ए. व पी. एच. डी. चे शिक्षण त्यांनी मुंबईत घेतले. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९१७ रोजी सांगली जिल्ह्य़ातील मणेराजुरी येथे झाला. त्यांनी बेळगावमधील लिंगराज कॉलेजमध्ये १९४४ ते १९५० या काळात काम केले. नंतर १९७७ पर्यंत सोलापूरच्या दयानंद कॉलेज मध्ये त्यांनी २७ वर्षे ज्ञानार्जनाचे काम केले. या काळात त्यांनी ज्ञानार्जन केलेले तीन नामवंत विद्यार्थी म्हणजे लेखक आणि समिक्षक असलेले निर्मलकुमार फडकुले, साहित्यकार यु. म. पठाण आणि केंद्रिय वीजमंत्री सुशील कुमार शिंदे.

त्यांची ‘झुक झुक गाडी’ सारखी बालगीतं, तशीच ‘चालला चालला लमाणांचा तांडा’ सारखी दहावीच्या पुस्तकातील कविता लोकप्रिय होती. वि. म. कुलकर्णी यांनी निरनिराळ्या ठिकाणी भरलेल्या कविसंमेलनात सहभाग घेतला. त्यांच्या कवितांना श्रोत्यांच्या पसंतीची दादही उत्तम मिळत असे. त्यांनी लिहिलेली ‘न्याहरी’ हा संग्रह आणि ‘विसर्जन’ ही कादंबरी विशेष लोकप्रिय ठरली. त्याशिवाय पहाटवारा, कमळवेल, अश्विनी, भाववाणी, पाऊलखुणा, प्रसाद रामायण, मृगधारा हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांचे ‘पहाटवारा’, ‘कमळवेल’, ‘अश्विमनी’ यांसारखे त्यांचे कवितासंग्रह खूपच गाजले. वि. म. च्या पुण्याच्या घराला त्यांनी ‘कमळवेल’ हेच नाव ठेवलं होते. फुलवेध, ललकार, अंगतपंगत, छान छान गाणी आदी गाणीही बच्चे कंपनीनी उचलून धरली. त्यांनी संपादनाच्या क्षेत्रातही काम केले. वृत्ते व अलंकार, साहित्यदर्शन, झुपुर्झा, पेशवेबखर, साहित्यशोभा, वाचनमाला आदी ग्रंथांचे संपादनही केले. कवितेप्रमाणेच कथा, कादंबरी, टीकात्मक आणि संपादित ग्रंथ अशी त्यांची ग्रंथसंपदाही आहे.

‘गरीबांचे राज्य’ या त्यांच्या कथेचा चित्रपटही गाजला होता. त्यांच्या अनेक गीतांच्या ध्वनि मुद्रिकाही जुन्या काळात गाजल्या होत्या. राज्य सरकारने उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांचा गौरव केला होता. ग. दि. मा पुरस्कार, भा. रा. तांबे बालसाहित्यिक पुरस्कार या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचेही ते मानकरी होत. वि. म. कुलकर्णी यांचे १३ मे २०१० रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..