धूळ हा आजच्या काळात एक डोकेदुखीचा मुद्दा होऊन बसला आहे, धुळीमुळे आपल्याला श्वसनाचे आजार जडतात त्यामुळे त्यापासून रक्षण करणे गरजेचे असते. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही नाजूक असतात ती धुळीमुळे खराब होतात अशा ठिकाणीही व्हॅक्यूम क्लीनरचा वापर केला जातो.
व्हॅक्यूम क्लीनरची संकल्पना ही झाडण्याला पर्याय म्हणून १८६० च्या सुमारास पुढे आली व विसाव्या शतकात ह उपकरणे स्वयंचलित बनली.
अमेरिकेतील आयोवामध्ये डॅनियल हेस यांनी पहिल्यांदा व्हॅक्यूम क्लीनरचा शोध लावला. त्याचे स्वरूप कारपेट स्वीपर असे होते. त्यानंतर इव्हज डब्ल्यू मॅकगॅफी यांनी वजनाने हलके यंत्र तयार केले. १८७६ मध्ये अमेरिकेत मेलविले बिसेल यांनी त्यांची पत्नी अॅना हिला भुश्याची धूळ झाडावी लागू नये यासाठी व्हॅक्यूम क्लीनर तयार केला होता नंतर मेलविले यांचा मृत्यू झाला व ॲना यांनी हा उद्योग हातात घेतला व एक नामांकित बिझीनेस वूमन झाल्या.
त्यानंतर जॉन एस थुरमन यांनी मोटरवर चालणारे व्हॅक्यूम क्लीनर यंत्र तयार केले, तेच प्रगत यंत्र होते. त्यानंतरच्या काळात एच.सेसिल बूथ, डेव्हिड केनी, वॉल्टर ग्रिफीथ, बोगेन्स हरमान चाईल्ड, जेम्स मरे स्पँगलर, हूव्हर यांनी या यंत्रात सुधारणा केल्या.
जेव्हा आपण सोडावॉटरच्या बाटलीत नळी घालून तो पितो त्यावेळी शोषून घेण्याची क्रिया करीत असतो पद्धत व्हॅक्यूम तीच क्लिनरमध्ये असते. जेव्हा आपण नळीतून हवा ओढतो तेव्हा नळीतील वरपासून खालपर्यंतच्या जागेतील हवेचा दाब कमी होतो. द्रवाचा दाब हा वरच्या दाबापेक्षा जास्त झाल्याने सोडा आपल्या तोंडात जातो.
व्हॅक्यूम क्लीनरमध्ये इनटेक पोर्ट, एक्सॉस्ट पोर्ट, इलेक्ट्रीक मोटर, फॅन, सच्छिद्र पिशवी असे काही भाग असतात. यात मोटर सुरू झाली की, फॅन फिरतो त्यामुळे हवा पुढे म्हणजे एक्झॉस्ट पोर्टकडे ढकलली जाते व त्याचवेळी पंख्याच्या पुढच्या भागात हवेचा दाब वाढतो, तर मागच्या भागात तो कमी होतो. हवेचा दाब कमी होताच एक पोकळी तयार होते तिला पार्टिकल व्हॅक्यूम म्हणतात. त्यामुळे बाहेरची हवा धुळीसह व्हॅक्यूम क्लीनरच्या या पोकळीत येते. नंतर ही धूळ मिश्रित हवा एका सच्छिद्र पिशवीतून जाते व त्यात धूळ काढून घेतली जाते व स्वच्छ हवा बाहेर सोडली जाते. यात हवेचा फवारा मारून हव्या त्या जागेतून धूळ बाहेर काढून शोषली जाते. त्यात घर्षणामुळे धूळ कार्पेटमधून मोकळी होते व आत ओढली जाते. यासाठी काहीवेळा रोटेटिंग ब्रशही वापरला जातो. यात पिशवीत धूळ जमवण्याची पद्धत नंतर बंद झाली, त्यासाठी ब्रिटिश इंजिनीयर डायसन यांनी अधिक प्रगत असा सायक्लोनिक क्लीनर शोधून काढला.
Leave a Reply