नवीन लेखन...

वाचकांना खिळवून ठेवणारे अनुवाद

पुस्तक परिचयः उदय सातारकर
आयटी क्षेत्रातील गतीमान घडामोडींवर ताज्या दमाचे लेखक चेतन भगत यांनी ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ आणि ‘वन नाईट @ द कॉल सेंटर’ या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. आयटी क्षेत्रातील युवकांच्या मानसिकतेचा मागोवा घेताना मुक्त अर्थव्यवस्थेचे प्रतिबिब त्यात आढळते. शिवाय ‘पितृऋण’ याकादंबरीतून पारंपरिक संस्कृतीतील नातेसंबंध उलगडत जातात. दुयर्‍या महायुद्धानंतर ज्यूंवर झालेल्या अन्यायाची कहाणी ‘शिडलर्स लिस्ट’ या कादंबरीतून समोर येते.

साहित्यावरून किवा अनेक चांगल्या कथा-कादंबर्‍यांवरून चित्रपट, नाटके निर्माण होतात. कल्पनेत असणारी भव्यता, पात्रांमधील स्वभावांचे पिळपेच याचं वास्तववादी दर्शन चित्रपटांमधून थेट रसिकांच्या डोळ्यासमोर उलगडत असतं. ‘शिंडलर्स लिस्ट’ हा चित्रपट असाच भव्य-दिव्य आणि रसिकांच्या पसंतीस उतरलेला. गेल्या काही वर्षांमध्ये स्टिव्हन स्पिलबर्गने अभिजात इंग्रजी साहित्याला रजतपटावर स्थान देत रसिकांना मेजवानी दिली. अनेक धक्कादायक घटना आणि प्रेक्षकांना गुंगवून ठेवणारी कथानके यामुळे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही जोरात चालले. ‘टायटॅनिक’, ‘ज्युरासिक पार्क’ या साहित्याला इंग्रजीतून जागतिक पातळीवर विविध भाषांमध्ये आणण्याचे काम स्पिलबर्गने केले. तसेच या साहित्यामधील चिरंतन जिवंतपणा कायम ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य त्या लेखकांनी केले.

‘शिंडलर्स लिस्ट’ ही ऑस्कर शिंडलरच्या दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील आयुष्यावर आधारित कादंबरी. ही कादंबरी काल्पनिक नाही, परंतु काल्पनिक वाटावी अशी सत्यकथा आहे. शिडलर ज्युडेन म्हणजेच शिंडलरने ज्यांना वाचवले त्या ज्यूंनी सांगितलेल्या कहाण्यांवर आधारित हे पुस्तक आहे. शिडलर्स लिस्टमधून पुढे आलेल्या या कहाणीने चांगल्या माणसाच्या भयाण, क्रूर काळातल्या जीवनचित्रणाने होलोकॉस्टवरील साहित्यात अत्यंत मोलाची भर घातली आहे. सर्वतर्‍हेच्या प्रतिकुलतेवर सर्वस्व पणाला लावून शिडलरने जे केले त्यातून थॉमस केनेली याला दाखवून द्यायचे आहे की एकटा माणूससुद्धा इच्छाशक्तीच्या बळावर कित्येकांचे नशिब घडवू शकतो. शिंडलर्स लिस्ट लेखक थॉमस केनेली यांनी आपल्या कादंबर्‍यांमधून ऐतिहासिक घटना नव्या

मानसिकतेतून लोकांसमोर मांडल्या आहेत. त्यांच्या पुस्तकातील नायक शिडलर नशिब घडवण्यासाठी क्रॅकोवमध्ये स्थलांतरित होतो. स्वस्तात मिळतात म्हणून ज्यू मजूर कारखान्यात वापरायला सुरुवात करतो. पण, जेव्हा त्याला जर्मन सरकारचा हेतू लक्षात येतो तेव्हा तोच कारखाना ज्यूंना मृत्यू छावण्यांपासून वाचवायचे साधन बनवतो. १९४० ते ४५ च्या दरम्यान विचित्र राजकीय मानसिकतेने नाझींनी युरोपची भूमी भस्मसात केली होती. ज्यूंचा वंश नष्ट करण्याची प्रतिज्ञा नाझी भस्मासुराने अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. यात सगळ्यात होरपळून निघालेला देश म्हणजे पोलंड होता. पोलंडमध्ये तीनशे छळछावण्या ज्यूंसाठी तयार करण्यात आल्या होत्या. या सगळ्याच परिस्थितीचा विचार करता शिडलर हा देवमाणूस कादंबरीत चितारला आहे. त्याने १२०० ज्यूंचे प्राण वाचवले आहेत. १९८३ मध्ये लिहिलेली ही कादंबरी १९९४ मध्ये रजतपटावर आली. या कादंबरीचा सुरेख अनुवाद संजय दाबके यांनी केला आहे. मराठी अनुवादीत कादंबर्‍यांच्या दालनात या अनुवादामुळे दर्जेदार भर पडली आहे.

पुस्तकाचे नाव ः शिडलर्स लिस्ट, लेखक ः थॉमस केनेली, अनुवाद ः संजय दाबके, पृष्ठे ः २८६, किमत ः ३०० रुपये.
सुधा मूर्ती कन्या आणि वडिल यांचं अतूट नातं जपणारी ‘पितृऋण’ ही कादंबरी लिहिली. माणसाचं आयुष्य विचित्र गुंतागुंत असते. यात विविध अतक्र्य घटना घडत असतात. काही नाती कोणतेही भावबंध निर्माण न करणारी असतात तर काही नात्याचे बंध हृदयात दीर्घकाळ जपणारी असतात. काळाचा पडदा सरून गेल्यावरही एखाद्या नात्याची खरी ओळख पटत राहते आणि मग जीवनाच्या चक्रात भावनांच्या कल्लोळात ती व्यक्ती गुंतून राहते. काळाचा बळी ठरलेल्या वडिलांची जबाबदारी स्वतःच्या आयुष्याचे मोल देऊन पूर्ण करणार्‍या मुलाची ‘पितृऋण’ ही सुधा मूर्ती यांची कादंबरी मंदाकिनी कट्टी यांनी अनुवादिक केली आहे.
पुस्तकाचे नाव ः पितृऋण, लेखक ः सुधा मूर्ती, अनुवाद ः मंदाकिनी कट्टी, पृष्ठे ः ८६, किमत ः ७० रुपये.
चेतन भगत हे नाव त्यांच्या उल्लेखनीय कादंबर्‍यांमुळे इंग्रजी साहित्यजगतात सुप्रसिद्ध झाले आहे. केवळ लेखक म्हणून पाहण्यापेक्षा भगत यांच्याकडे आज ‘युथ आयकॉन’ म्हणून पाहिले जाते. भगत यांनी भारतातील लहानथोरांना वाचनाची आवड लावली आहे. कादंबरीबरोबरच हिदी, इंग्रजी वर्तमानपत्रातून ते स्तंभलेखन करतात. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर संसदेत चर्चा झाली आहे. आयआयटीमधून पदवी घेतलेले चेतन भगत यांनी इंटरनॅशनल इन्व्हेसमेंट बँकिग करिअर सोडून लेखनाला पूर्ण वेळ दिला आहे. २००९ पासून त्यांनी अक्षरधनाची महती वाचकांपुढे आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत मांडली आहे. भारताची सद्यस्थिती बदलण्यासाठी काही तरी करणे आवश्यक आहे आणि ते भगत आपल्या लिखाणातून करतात. ‘वन नाईट ऽ द कॉल सेंटर’ आणि ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ या दोन कादंबर्‍या त्यांच्या या हेतूचे सर्वार्थाने समर्थन आणि प्रतिपादन करतात. ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ यात उद्योग, व्यवसाय, क्रिकेट आणि धर्म याभोवती गुंफलेली कहाणी आपल्यापुढे उलगडत जाते. तीन मित्रांची ही कथा असून स्वतःच्या इच्छा-आकांक्षा आणि स्वप्ने घेऊन ती समाजात स्वतःचे अस्तित्व अधोरेखित करू इच्छितात. परंतु, वास्तवात येणार्‍या संकटांना, अडचणींना तोंड देणे किती अवघड आहे आणि कल्पना तसेच वास्तवात किती फरक आहे हे त्यांना अनुभवातून समजून येते. स्वप्नपूर्तीसाठी ते

जीवनाच्या धगीचा सामनाही करतात. तो कसा करतात हे भगत यांच्या ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ या पुस्तकातून उलगडते. विलक्षण सहजसोपी लिखाणाची शैली हे भगत यांचे वैशिष्ट्ये आहे. ही शैली तशीच ठेवण्यात अनुवादिका सुप्रिया वकील यशस्वी झाल्या आहेत. दोन्ही पुस्तकांची भाषांतरे सुप्रिया वकील यांनी भगत यांच्या शैलीस

धक्का न लागेल अशा पद्धतीने केली आहेत. त्यामुळे लेखकाचा हेतू थेट वाचकांपर्यंत पोहोचतो.‘वन नाईट ऽ द

कॉल सेंटर’ यामध्येही आजच्या भारताची आणि त्यातील युवकांची मनोभूमिका लेखकाने स्पष्ट केली आहे. रेल्वेतील एका रात्रीच्या प्रवासात एका मुलीने सांगितलेली ही कहाणी वाचकांना खिळवून ठेवते आणि आयटी क्षेत्रातल्या वास्तवाचे भान देते.

(अद्वैत फीचर्स)

— उदय सातारकर – अद्वैत फीचर्स

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..