![p-105444-vaachan-sanskaar](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2023/07/p-105444-vaachan-sanskaar-663x381.jpg)
वाचाल तर वाचाल, असे आपण नेहमी ऐकतो. या उक्तीची कृती करण्याची कशी गरज आहे, हे या पुस्तकावरून समजते. लेखक सतीश पोरे यांच्या या पुस्तकातील एकूण ९ भागांतून वाचन संस्कृतीचा वेध घेतला आहे.
वाचनाचे फायदे, प्राथमिक शिक्षणाच्या दृष्टीकोनातून वाचन, वाचनारंभ, वाचन शिकण्याच्या पद्धती यांचा मागोवा पुस्तकातून घेतला आहे. वाचन आकलन, शब्दसंपत्ती व वाचनपातळया, यांची माहितीही ते देतात.
वाचनाची आवड वाढवणे कसे आवश्यक आहे आणि त्यासाठी काय करता येईल, या विषयी सल्लेही ते देतात. वाचन क्रियेतील अडचणींकडे लक्ष वेधतात; तसेच वाचनाच्या वेगाची संकल्पना समजावून सांगतात. एकूण वाचनाविषयी सर्व काही असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
Leave a Reply