नवीन लेखन...

मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक भाऊ पाध्ये

सत्तरच्या दशकात मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक भाऊ पाध्ये यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९२६ रोजी दादर येथे झाला.

भाऊ पाध्ये यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे असे. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला होता. भाऊ पाध्ये यांचं पूर्ण नाव प्रभाकर नारायण पाध्ये. मुंबई विद्यापीठातून १९४८ साली त्यांनी अर्थशास्त्र घेऊन पदवी मिळवली.

१९४९ ते ५१ या काळात ते कामगार संघटनेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते होते. नंतर किंग जॉर्ज हायस्कूल , एल कदूरी हायस्कूल आणि बी. एस. इझिकेल हायस्कूल ), येथे शिक्षकाची नोकरी केली. पुढे स्प्रिंग मिल येथे ४ वर्षं आणि आयुर्विमा महामंडळ येथे ४ महिने कारकुनी केली. १९५६ साली शोशन्ना माझगावकर या कामगार संघटनेच्या कार्यकर्तीशी त्यांनी लग्न केले.

‘हिंद मझदूर’, ‘नवाकाळ’ (१ वर्ष), ‘नवशक्ति’ (११ वर्षं) या नियतकालिकांतून पत्रकारिता. ‘नवशक्ती’ सोडल्यावर काही काळ ‘झूम’ या सिने-साप्ताहिकाचे संपादन. ‘रहस्यरंजन’, ‘अभिरुची’, ‘माणूस’, ‘सोबत’, ‘दिनांक’, ‘क्रीडांगण’, ‘चंद्रयुग’ या नियतकालिकांतून स्तंभलेखन केले. सोबत मध्ये पिचकारी नावाचे सादर लिहित असत.

भाऊ पाध्ये यांनी ‘वासूनाका, अग्रेसर, राडा’ डोंबाऱ्याचा खेळ या कादंबर्याे लिहिल्या. ‘राडा’ मध्ये उच्चभ्रू कुटूंबातील तरूण, मनाविरूद्ध झालेले निर्णय सहन करू न शकल्याने वाहवत जातो. महानगरीय वातावरणात विविध सामाजिक, राजकीय प्रवाह निर्माण होत असतात व त्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम समाजमनावर होत असतो. अशा परिणामाच्या काही पिढ्या असतात. डोंबाऱ्याचा खेळ या कांदबरीतून मुंबईतील व्यक्तिजीवनाचा सम्रग वेध भाऊ पाध्ये यांनी घेतला आहे. सत्तरच्या दशकात शिवसेनेने मुंबईत आपला प्रभाव निर्माण करायला सुरवात केली होती. कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर असलेल्या या शहरात कापड गिरण्या व गिरणी कामगार यांची वेगळीच संस्कृती निर्माण झाली होती. बहुतांश कामगार वर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपरर्याातून आला होता. शिवसेनेचा अजेंडा मराठी मनाला भुरळ घालणारा होता. त्यामुळे महानगरीय वातावरणात मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जाणार्याे मराठी तरूणांना शिवसेना हे हक्काचे व्यासपीठ मिळाले. त्यामुळे शिवसेनेचा झपाट्याने विस्तार झाला. कामगार संघटनांतून कम्युनिस्टांची हकालपट्टी करून सेनेने मराठी ताकद आपल्या पाठीशी उभी केली. ‘राडा’ मध्ये ही सारी पार्श्वभूमी येते. किंबहूना या वातावरणातूनच तिची निर्मिती झाली आहे. पाध्येंनी या बदलांमुळे होणार्याा परिणामांचे मानसिक विश्लेषण न करता कादंबरीत संवादात्मक व पटकथात्मक, सरळ मांडणी करून विश्लेषण व निर्णयाचे स्वातंत्र्य वाचकांवर सोपविले आहे. त्या काळात ही कादंहबरी वादग्रस्तही ठरली होती.

पाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना अभिव्यक्त केल्या आहेत.

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी ’भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा – कथा/लेख/भाषणं’ या नावाने आणि राजन गवस यांनी ’भाऊ पाध्ये यांची कथा’ या नावाने पाध्यांच्या कथांचा संग्रह संपादित केला आहे. राजन गवस यांनी पाध्ये यांच्या साहित्यावर पीएच. डी. केलेली आहे.

भाऊ पाध्ये यांचे ‘करंटा’ (१९६१), ‘वैतागवाडी’ (१९६४), ‘वासूनाका’ (१९६५), ‘डोंबाऱ्याचा खेळ’ (१९६७), ‘अग्रेसर’ (१९६८), ‘होमसिक ब्रिगेड’ (१९७४), ‘राडा’ (१९७५), ‘वणवा’ (१९७८), ‘वॉर्ड नं. सात सर्जिकल’ (१९८०), ‘जेलबर्ड्स’ (१९८२) या कादंबऱ्या आणि ‘एक सुन्हेरा ख्वाब’ (१९८०), ‘मुरगी’ (१९८१), ‘थालीपीठ’ (१९८४), ‘थोडी सी जो पी ली’ (१९८६), ‘दावेदार’ (१९९२) हे कथासंग्रह उपलब्ध आहेत.

भाऊ पाध्ये यांचे निधन ३० ऑक्टोबर १९९६ रोजी झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट

http://bhaupadhye.blogspot.in

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..