नवीन लेखन...

वडिलांचा आशिर्वाद

नव्हतो कधींही कवि वा लेखक     कसे घडले कांहीं न कळले

साहित्य सेवेचा गुण मिळूनी     काव्य मजला सूचू लागले    १

वाङ्‍मयाविषयी प्रेम होते     वडीलांना त्या काळी

अथांग ज्ञान त्यांनी मिळविले     पुस्तके वाचूनी सगळी   २

खो – खो मधल्या खेळा सारिखे     खो देत ते गेले बसूनी

साहित्याची ठेव सोपवूनी मज     ते गेले चटकन निघूनी   ३

गोंधळून गेलो होतो मनीं    नव्हते ज्ञान कांहीं मजला

बरसत असतां त्यांचे ज्ञान    छिद्रे होती मज झोळीला   ४

कुणीही नसता मार्गदर्शक    घडत होते सारे अवचित

चेतना देण्यास मज लागी     आशिर्वाद त्यांचा होता सतत    ५

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..