लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता बाळ कोल्हटकर यांचे ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे एक लोकप्रिय व गाजलेले नाटक. बाळ कोल्हटकर म्हणजे महाराष्ट्राचे छोटे गडकरी म्हणून रसिकांनी गौरविलेले व्यक्तिमत्व.
१९ जून १९६४ साली भावे नाटयगृह, सांगली येथे या नाटकाचा पहिला प्रयोग झाला, ते आजतागायत नाटक रसिकांच्या पसंतीस उतरलेले आहे. अभिनेत्री आशा काळे, गणेश सोळंकी व सुभाष हे पात्र अजरामर केलेले बाळ कोल्हटकर यांनी त्या काळात दोन हजाराच्या वर प्रयोग केले होते. आज त्या नाटकाला ५० पेक्षा जास्त वर्षे होऊन गेली आहेत.
१९६४ साली हे नाटक पहिल्यांदा सादर केले गेले. त्यावेळी त्याने लोकप्रियतेचे उच्चांक निर्माण करत चौदाशे प्रयोगांची मजल गाठली होती. त्यानंतर १९८४ साली विजय गोखले आणि निवेदिता जोशी-सराफ यांनी हे नाटक सादर केले होते. या नाटकाचा लूक साठीतला असला तरी अभिनयाची शैली आजची आहे. त्यामुळे आजच्या पिढीलाही हे नाटक आपलेसे वाटून ते भारावून जातात, बाळ कोल्हटकर यांचे लेखन मुळातच खूप सुंदर आहे. त्यांच्या दोन-दोन ओळींच्या कविता खूप गहन अर्थ सांगून जातात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
मराठी मनाची पकड घेण्याचे विलक्षण सामर्थ्य या नाटकात आहे. मध्यमवर्गीय पांढरपेशा घरातील ही एक अत्यंत हृदयद्रावक कहाणी अतिशय घरगुती घटनेत आणि भाषेत मोठ्या नाट्यपूर्ण पद्धतीने लेखकाने सांगितलेली आहे! प्रत्येक पात्र आपल्याला इतके परिचयाचे वाटते की, ते कुठे न कुठे आपण पाहिले आहे असाच एकसारखा भास होत रहातो! असे असूनही त्या त्या पात्राचे वैशिष्ट्य अगदी ठळक शब्दात चितारून लेखकाने नाटकाच्या मनोरंजकतेत आणि आकर्षतेत चैतन्य निर्माण केले आहे.”
— आचार्य अत्रे यांच्या प्रस्तावनेतून
https://www.youtube.com/watch?v=mK8ZIUiW7iI
वाहतो मी दूर्वाची जोडी या नाटकातील व्यक्ति
परिक्षण प्रोजेक्ट साठी माहिती सांगा
मला या नाटक विषयी थोडी माहिती हवी आहे मला प्रकल्प दिला आहे
अनेक वर्षे पाहू म्हणून हे नाटक आता पाहिले आणि सर्व अर्थाने फारच आवडले. ६० च्या दशकातील प्रसंग, भाषा, संदर्भ पाहून ऐकून त्या काळात वावरत आहे असे वाटले. धन्यवाद
He natak amhi radio var aikal hota. Khupach chhan.ashi natak punha punha vhavit.