मुंबईतील वैकुंठमाता –
मुंबईच्या पूर्व भागातील म्हणजे, सध्याच्या डॉकयार्ड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला २५० फुटावर असलेल्या टेकडीवर वैकुंठमातेचं देऊळ वसलं आहे, या मंदीरातील देवीची मूर्ती पाषाणाची असून ती वाघावर आरुढ आहे; दीड फुट उंच असलेल्या वैकुंठमातेच्या मूर्तीला चार हात आहेत; समुद्रलगत हीटेकडी असल्याने, सागराचं विहंगम रुप देखील या मंदिरातून टिपता येतं; वसई किल्ला सर करताना चिमाजी अप्पांनी या क्षेत्राचा उपयोग केला व ही मोहिम यशस्वीरित्या पार पडल्यावर या देऊळाचा जिर्णोद्धार केल्याची नोंद आहे; महाशिवरात्रीच्या दिवशी वैकुंठमातेची वार्षिक जत्रा भरते.
— सागर मालाडकर
Leave a Reply