सुमती शाळेत शिक्षिका तर माधवराव एक छोटेसे उद्योगजक. शाळेची वेळ सकाळची म्हणून त्या लवकरच उठून सगळे आवरुन. स्वयंपाक. डबे सातला घराबाहेर पडायच्या आणि एकला घरी. ते सकाळी दहा वाजता निघायचे जवळपास असलेल्या खेडेगावातील एका भागात. त्यामुळे त्यांनाही घरी यायला बराच उशीर व्हायचा. मुलांची शाळाही सकाळीच. त्यामुळे त्यांना सगळेच एकटीला करावे लागले होते. फक्त भांडी धुण्यासाठी बाई. आणि घरी आल्यावर वेळ होताच थोडा. मुले मोठी झाल्यावर दुसर्या शहरात शिकायला हॉस्टेलवर. आणि नंतर लग्न वगैरे झाले. आता हे दोघेही मुलाजवळ आहेत.मुलगा सून नोकरी करतात. सकाळी जाउन रात्री आठ पर्यंत घरी. म्हणून नातवाला सांभाळणे. घर आवरणे. भाजी निवडणे अशी कामे त्या करतात. मावशी बाई स्वयंपाकापासून सगळे काही करतात. आता नातू मोठा झाला आहे आणि हे दोघे थकत चाललेले. लॉकडाऊन मुळे दोघांना घरुन काम आहे. त्यामुळे घरातील कामे आणि इतर गोष्टी करतांना तिची दमछाक होते म्हणून चिडचिड होते….
असेही बऱ्याच वेळा सून बाईनी सुमतीला म्हटले होते की आई तुम्ही मुलाला वळण लावायला हवे होते. टॉवेल देणे. जागेवर लावणे. आपले कपडे आवरणे. वस्तू जागेवर ठेवणे. किमान एवढे तरी. आणि भाजी आणायला सांगितली तर काय घोळ घालून ठेवतात. ते साध पण जमत नाही. आणि सासूबाईनीही अनेक वेळा सांगितले होते की नोकरीची वेळ सकाळची वळण लावत बसले असते तर नोकरी जमली असती का? आणि बरेच वेळा सांगितले होते थोडा हातभार लावला होता पण परगावी गेल्यावर सवय मोडून गेली. तो नोकरीत असतानाही वेळ सकाळचीच म्हणून मला करावे लागले. खेडेगावातून येताना रोजच ताज्या भाज्या आणत असत येताना. आणि पुढील काही वाक्ये मनात म्हणाल्या. अग बाई तुम्ही दोघे नोकरी वर गेल्यावर मीच तुमची खोली आवरायची. कपडे. सौंदर्य प्रसाधने आणि इतर बरेच. रोहनला सांभाळून स्वयंपाक त्याचे खाणे पिणे आवरुन घरची कामे केलीत. तर यांनी बाहेरची कामे सांभाळून घेतली होती पण आता आम्हाला होत नाही. आम्ही लावले नाही वळण पण तू लावू शकतेस तुझ्या मुलाला नवऱ्याला. आमची हरकत नाही..
तोच सून बाईनी रोहनला सुनावले. अरे काय हा पसारा. ऑफिसचे करु की तुझे करु. रोहनचे ऊत्तर हे बघ ममा माझे यंदा दहावीचे वर्ष आहे. ऑनलाईन अभ्यास वरुन परीक्षेचे टेन्शन मी नाही करु शकत. आणि तसेही तू माझ्या खोलीत कशाला डोकावतेस. तुम्ही पूर्वी मॉल मधून भाजीसह सगळे आणत होता म्हणून आता ऑनलाईन वरुन मागवा. मला जमत नाही व आणलेले तुला आवडत नाही. मलाही चिडचिड होते..
वळण आणि सवय या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. काही गोष्टी शिकवाव्या लागतात तर काही उपजतच असतात. त्यामुळे एखाद्याला तुम्ही हे केले नाही. असे करायला हवे होते. असे ताशेरे ओढणे बरोबर नाही. आपलेही आत्मपरीक्षण करावे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. याचा विचार करून दोष दाखवले जाऊ नयेत. आपण काय करतो हे लक्षात घेतले तर. दुसरे दुखावले जाणार नाहीत.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply