रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे वास्तव्य असलेले प्रा. नीतिन आरेकर यांनी एका सुसंस्कृत आणि रसिक घरात जन्म घेतल्यामुळे त्यांना अनेक नामवंतांचा सहवास लाभला.
ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, पं. भीमसेन जोशी, उस्ताद अल्लारखां, पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन, पद्मभूषण संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना, संगीत मार्तंड दिलशाद खान, बॅरिस्टर ए. आर्. अंतुले, शेतकरी कामगार पक्षाचे जुने नेते तु. ह. वाजेकर अशा अनेक दिग्गजांना भेटण्याची त्यांच्याशी जवळून बोलण्याची संधी त्यांना मिळाली होती. त्यांनी मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यावेळी डॉ. सरोजिनी वैद्य, डॉ. विजया राजाध्यक्ष, प्रा. पुष्पा भावे, प्रा. गंगाधर पाटील, प्रा. शंकर वैद्य, प्रा. अरुण कांबळे, डॉ. वसंत पाटणकर, प्रा. सुभाष भेंडे अशा दिग्गजांबरोबर त्यांचा संबंध आला. कविवर्य नारायण सुर्वे यांच्याबरोबर त्यांचा विशेष स्नेह जडला होता.
प्रा. नीतिन आरेकर यांनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून बरंच समीक्षात्मक, संशोधनपर लेखन केलेलं असलं तरीही त्यांची ओळख शब्दांकनकार म्हणून अधिक आहे. लोकसत्तामध्ये गाजलेल्या ये है मुंबई मेरी जान ह्या सरदार कुलवंतसिंग कोहली यांच्या सदराचे शब्दांकन त्यांनी केले.
लोकसत्ता, आम्ही डोंबिवलीकर, सकाळ, प्रीमिअर, तारांगण अशा लोकप्रिय दैनिकांत किंवा नियतकालिकांत त्यांनी अनेक नामवंतांच्या भेटी घेऊन त्यांच्या अनुभवांचं शब्दांकन केलेलं आहे. या निमित्ताने ते पद्मश्री शंकर महादेवन, संगीतकार प्यारेलाल शर्मा (लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीतील संगीतकार), संगीतकार आनंदजीभाई शहा (कल्याणजी आनंदजी जोडीतील एक), ज्येष्ठ गायक रामदास कामत, ज्येष्ठ गायिका नीलाक्षी जुवेकर,संगीतकार श्रीधर फडके, झेंबे वादक व दिग्गज तबलानवाज तौफिक कुरेशी, चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, अभिनेते पद्मश्री मनोज जोशी, विनोदवीर जॉनी लिव्हर, खासदार डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर, संवेदनशील दिग्दर्शक विरेन्द्र प्रधान, संजय जाधव, रवी जाधव, हेमंत देवधर, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, कल्पक प्राचार्य दिनेश पंजवानी, के. सी. कॉलेजच्या माजी प्राचार्या मंजू निचानी, साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, कवी अरुण म्हात्रे, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, ज्येष्ठ संपादक व कवी अरुण शेवते, ज्येष्ठ संपादक डॉ. भारतकुमार राऊत, निर्माती नीना राऊत अशा विविध व्यक्तिमत्त्वांना भेटले.
लोकांना माहिती असलेल्या त्यांच्या रूढ व्यक्तिमत्त्वापलिकडील एक वेगळी व्यक्ती त्यांना दिसली. त्या व्यक्तिमत्त्वांचा शोध नीतिन आरेकर यांनी घेतला आहे – “वलयांकितांच्या सहवासात” या सदरामध्ये.
दर आठवड्याला ते ह्या सदरातून एका व्यक्तिमत्त्वाला घेऊन तुम्हाला भेटणार आहेत.
या आठवड्यात आपण भेटणार आहोत पद्मविभूषण तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांना !
प्रा. डॉ. नीतिन आरेकर यांचा अल्प परिचय..
मराठी विभागप्रमुख,
श्रीमती चांदीबाई हिंमथमल मनसुखानी महाविद्यालय, उल्हासनगर
- तीस वर्षांचा अध्यापनाचा अनुभव
- माजी सदस्य, मराठीचे अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ
- अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांवर कार्यरत
- लोकसत्तामध्ये गाजलेल्या ये है मुंबई मेरी जान ह्या सरदार कुलवंतसिंग कोहली यांच्या सदराचे शब्दांकन व त्या सदराचे राजहंस प्रकाशनाकडून स्वतंत्र पुस्तक. याखेरीज ऐवज, आणि मी स्त्रीत्त्व कुरवाळले नाही, एकच मुलगी अशा सात संपादित पुस्तकांत लेखनसमावेश
- ऋतुरंग, ललित, लोकसत्ता दि. अंक, प्रीमिअर, तनिष्का, तारांगण, दै. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, सकाळ इ. ठिकाणी नियमित लेखन
- मराठी सृष्टीचे प्रारंभापासूनचे लेखक
- झी मराठी वरील उंच माझा झोका या मालिकेसाठी संशोधन सहाय्य, सावित्री: एक क्रांती (हिंदी- किसान चॅनेल), आवाज- ज्ञानेश्वर या मालिकांचे संशोधन
???
Excellent , नितीनजी, बेहेतरीन शब्दांकन, तुमच्या झाकीरजींच्या लेखावरुनच ते लक्षांत आल.
संगीत माझा प्रांत नाही, गाता येत नाही, आल असत, शिकलो असतो तर नाट्यगीतं, शास्त्रिय अस गायलो असतो, पण ऐकायला आवडत. आवडते गायक, हेमंत कुमार, गीता दत्त आणी किशोर तर लाजवाब ! त्याची मन्ना डे बरोबरची इक चतुर नार… कितीही वेळा ऐका. ही आवड हिंदी सिनेमा मुळे, तिवर्याहुन कर्जतला ५६ मधे रहायला आल्यावर, आमराईतल्या तंबु टाॕकीज मधे जे सिनेमे पहायला मिळाले त्यामुळे.
हे विषयांतर झाल, बोलायच होत तुमच्या शैली विषयी, लेखन/शब्दांकन शैली विषयी. कसदार गायकानं ताना घेत गावं, तस तुम्ही सहजतेन शब्दांचा सालंकार, अर्थपुर्ण व समर्पक वापर करुन शब्दांकन खुलवता, अप्रतीम !
संगीतात जाणकरी नसली तरी, झाकीरजींच तबलावादन मला मंत्र मुग्ध करत, परवीनजींच गायन -थोरले बंधु अनंत बिवलकर, यांच्या त्या फेवरेट गायिका- कळत नसल तरी भावत म्हणुन ऐकल आहे. तुमचा या दोन्ही वलयांकीतांशी ईतका जवळचा परिचय आहे,त्याच आश्चर्य व कौतुक वाटत.
परत तुमच्या लेखनशैली विषयी, वाचतांना माणुस आकर्षित होत, संपुर्ण वाचल्या शिवाय थांबु शकत नाही, ईतक सामर्थ्य आहे.
वाचनाची गोडी मात्र मला लहानपणा पासुनच लागली-परत विषयांतर-थँक्स् टु कर्जत आणी लक्ष्मिकांत वाचनालय. त्या मुळे ओघवत्या शैलीचे लेखक म्हणजे, प्रथम पुल, नंतर, अर्नाळकर, बोकील, माडगुळकर, मिरासदार, गाडगीळ, वर्टी या सर्वांशी परीचय कर्जतमधेच झाला. अलीकडील कणेकर संझगिरी वगैरे, यांच्या तुलनेत तुमची शैली कुठेही कमी पडत नाही, कांकणभार सरसच !
धन्यवाद,असच लिहितरहा.??