प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं.. खरंच प्रेमाच्या व्याख्या वेगवेगळ्या असल्या, ते व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असली तरी ती भावना आणि दोघांमधील प्रेम मात्र एकमेव असते. पण आजच्या “व्हॅलेंटाइन डे‘चे नुसतेच आकर्षण राहिले आहे.
‘व्हेलंटाईन’ची कथा रोमन साम्राज्याशी संबंधित आहे. रोमन सम्राट क्लॉडियसच्या काळात ‘संत व्हॅलेंटाईन’ याने प्रेमविरांना भेटविले असा संदर्भ दंतकथांमधून आहे. क्लॉडियसने सैन्यातील शिपायांनी लग्न करू नये, असा फतवा काढला होता. त्यामागे कारण होते की, ज्यांचे लग्न झालेले असते, ते जीवावर उदार होऊन साम्राज्य किंवा देशासाठी लढत नाहीत. त्यावेळी ‘संत व्हॅलेंटाईन’ याने सम्राटाच्या आज्ञेविरोधात जाऊन प्रेमी युगल असलेल्या सैनिकांची गुप्तपणे लग्ने लावून दिली. सम्राटाला ‘व्हॅलेंटाइन’च्या त्या कृतीचा खूप राग आला. त्याने चिडून जाऊन ‘व्हॅलेंटाईन’ला देहदंड दिला. ज्या दिवशी ‘व्हॅलेंटाईन’ला मरण आले, तो दिवस ‘व्हॅलेंटाईन्स डे’ अर्थात ‘प्रेमदिन’ म्हणून साजरा करण्याची पद्धत युरोपीयन देशात सुरू झाली. भावना प्रेमाची असली तरी तो एका संताचा स्मृती दिन आहे हे लक्षात घ्यावे. खरं तर १९९२ पर्यंत भारतात व्हॅलेंटाइन डेबद्दल फारशी माहिती नव्हती. मुळात ते भारतीयांपर्यंत पोहोचलेच नव्हते. त्यानंतर माध्यमांद्वारे हे लोकांपर्यंत पोहोचले आणि आज व्हॅलेंटाइन डे हे एक ग्रॅण्ड सेलिब्रेशनच होते.
पूर्वीची हृदयातील धड..धड..आजही तीच असली, तरी आज ही धड.. धड.. व्हॉटस् ऍपची टिव.. टिव.. झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
प्रेमाचा रंग वेगळाच असतो. प्रत्येकाला कुणा प्रतीतरी प्रेम असतेच. हे प्रेम व्यक्तल करण्याचा दिवस म्हणजे “व्हॅलेंटाइन डे‘. मग ते प्रेम पती- पत्नीतील असेल, आई- मुलाचे असेल, प्रियकर- प्रेयसीचे असेल किंवा अन्य कोणाचे. “व्हॅलेंटाइन डे‘ची तरुणाईमध्ये अधिक आतुरता दिसून येते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply