Valantine Day is essentially the concept & part & Parcel of western culture. In the present Era of ”Global Village” The cultural Trails of cultures Eastern and Western – ”Go hand in hand”. It is to say that the ”Blending of Cultural Traits is on fast track.
“व्हॅलेंटाईन डे” अर्थात प्रीती-दिन, प्रेम-दिवस ही संकल्पना पश्चिमेकडून आपल्याकडे आली प्रेम, आत्मीयता अंत:करणापासून आतुन मनापासुन असावं लागतं त्याच्या प्रकटीकरणासाठी या अभिव्यक्तीसाठी ठराविक दिवसांत नियोजन करणं ही गोष्ट आपल्या हिंदू संस्कृतीत न सामावणारी आहे. तथापि वैश्विक व्यापकतेच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडेदेखील “व्हॅलेंटाईन डे” ही संकल्पना रुजत चालली आहे. पाश्चिमात्य आणि पौर्वात्य संस्कृतीचा सुरेल संगम दर्शविणारी ही प्रथा आहे.
प्रेम! पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, बहिण-भाऊ, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मित्र-मित्र, आई मुलगा, पिता-पुत्री, आई वडील आणि मुले अशा नानाविध व्यक्तींमध्ये व्यक्त होणारी ही मृदु सुकोमल भावना !! या सर्व स्नेह-बंधामधून आई-वडिल आणि मुले यांच्या मधील स्नेह, जिव्हाळा, आपुलकी, आत्मियता, ममता, प्रेमाचा उमाळा व्यक्त करणारी संकल्पना सर्वांत स्तुत्य आणि लौकिकार्थानं व्यापक
अशा अभिजात संकल्पनेला उचलून धरण्याची किमया आपल्या आदरणीय प्रसाद सरांनी करुन दाखविली. मुलांमध्ये आई वडिलांविषयी नि:सीम प्रेम जोपासण्याची प्रसाद सरांची ही कल्पक झेप खरोखरच वाखाणण्यासारखीच आहे.
“मातृदेवोभव-पितृदेवो भव”
या आपल्या परंपरेला आदरणीय प्रसाद सरांनी एका वेगळ्या ऊंचीवर नेऊन ठेवले आहे त्यांची ही विचारसरणी, कृती-शीलता आणि वर्तनशैली नि:संशय स्पृहणीय, अनुसरणीय, अनुकरनीय आहे यांत तीळमात्र शंका नाही. मला वाटते, अशा तर्हेचे “सांस्कृतिक व्हॅलेंटाईन डे” प्रत्येक पाठशाळेत रुजल्यास ते एक, क्रांतिकारक सामाजिक कार्य ठरेल, तरुण पिढी घडविल्यास निश्चितच हातभार लागेल.
माता पित्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय, याचे दाखले आपल्या हिंदू संस्कृतीत ठायी ठायी अढळून येतात. श्री गजानन अखिल विश्वाचं आराध्य दैवत त्याच्या प्रथम पूजना विषयी कोणतेही शुभ कार्य सुरु होत नाही. त्या विघ्नहर्त्या गजाननाची कथा सर्वकृत आहे. आई-वडिल-शंकर-पार्वती हेच एकमेव आपले विश्व, हेच आपले ब्रम्हांड हे सत्य आई-वडिलांना एक प्रदक्षिणा घालुन सिद्ध करणारा सिद्धिविनायक म्हणूनच जगात वंद्य ठरला. ही कथा सर्वश्रुत आहे, याविषयी जास्त सांगणे न लागे.
श्रावण-बाळ! आपल्या अंध आणि वृद्ध माता-पित्याच्या सेवेसाठी त्यानं जिवाचं रान केलं. माता-पित्यांच्या श्रांत, तुझ देहाला आराम देण्यासाठी कावडी मधून आपल्या खांद्यावरुन त्यांना रानावनांतुन घेऊन जातांना त्याला परमानंद होत असे, कृतार्थता वाटत असे. आई-वडिलांचे त्याला कधीच ओझे वाटले नाही. त्यांच्या सेवेसाठी तो सदैव तत्पर होता त्यांची तहान भागविण्यासाठी त्याला आपल्या जीवनांच मोलद्याव लागलं! असा आदर्शबाळ – श्रावणबळ पुन्हा होणे नाही !!
मर्यादा पुरुषोत्तम दशरथी राग ! प्रभुरामचंद्रांनी आपल्या पित्याच्या राजा दशरथाच्या वचनपूर्तीसाठी आणि कैकयी मातेच्या इच्छापूर्तीसाठी —– आज्ञा शब्द शिरोतार्थ ठेवुन बारा वर्षे वनवास स्विकारला! आई-वडिलांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करणारं असं पुरुषोत्तम व्यक्तीमत्व होणे नाही. मला कैकयी जरी सावत्र माता असली तरी माताही माताच असते, ती कधीच सावत्र नसते! माय- पित्याच्या आज्ञेचा, सेवेचा उचुंग अन् उल्लेखनीय मापदंड प्रभु रामरायानं जगासमोर ठेवला.
भक्त पुंडलिक ! आई-वडिलांची मनोभावे सेवा हीच ईश्वर सेवा हीच प्रभुसेवा – या शाश्रत संकल्पनेचा सर्वोत्तम उदाहरण. असा भक्त होणे नाही.
आपल्या वृद्ध माता पित्यांची सेवा करण्यांत तो रममाण होत असे, तल्लीन होत असे, एकचित्त होत असे, आई-वडिलांची सेवा करीत असतांना त्याच्या मुखांतुन विठ्ठल नामाचा अखंड गजर सुरु होता. देहभान विसरुन सेवावृत्ती अवस्थेत नामस्मरण सुरु होते भगवंताला आपल्या भक्तीची परीक्षा घेण्याची लहर येते —— साक्षांत विठ्ठ्ल पुंडलिकाच्या दारासमोर येऊन उभा ठाकला. क्षणभर थांबून विठ्ठल माऊली म्हणाली.
“पुंडलिका, बाळा ये, तुझ्या भक्तीभावानं मी तुजवर प्रसन्न झालो आहे. ये माझ्या भेटीला ये!”
त्यावर भक्त पुंडलिक विनम्रपणे वदला
“पायचेपितो माय-पित्याचे,
करु द्या ही चाकरी।
विठ्ठला, उभे रहा तोवरी ।।
असं म्हणून जवळच असलेली वीट, पांडुरंगाकडे सरकवली,
भगवंत तेव्हा पासुन उभे आहेत.
युगे अठ्ठावीस
कर ठेवुनि कटिवरी,
उभा विठ्ठल विटेवरी।
अज्ञा नानाविध कथांमधून आणि दाखल्यांतून आई-वडिलांची महती वर्णन करण्यास शब्द थिटे पडतात, वाणी अपुरी पडते माता पित्यांची सेवा हीच ईश्वर सेवा होय. मनापासून आई-वडिलांची सेवा केल्यास, आपल्या हातून घडल्यास वेगळी भगवत् प्रसाद हीच ईश्वर सेवा होय, आई-वडिलांची सुयोग्य सेवा हीच ईश्वर प्राप्तीची गुरु किल्ली.
मुलांच्या मनांत, अंतरंगांत उत्तमोत्तम विचार रुजविण्याचे बिंबवण्याचे काम आई-वडिल निश्चितपणे करीत असतात. मनापासून केलेल्या गोष्टीला, उशिरा का होईना प्रतिसाद मिळतोच असा माझा अनुभव आहे.
वडीलधार्यांविषयी आदर, आई-वडिलांविषयी आपुलकी, प्रेम, थोरामोठ्यांची कदर, मानसन्मान आणि संतांविषयी पूज्यभाव आधि पैलुंची जाण देण्याचे काम आई वडिलांनीच करावयाचे असते. नैतिक अधिष्ठानचा उगम माय-पित्यापासून होतो हे सत्य आहे, नाहीतर संत कबीराच्या ओव्या प्रमाणे
“बोया पेड बाबुल का, आम कहॉ से आया ”
अशी स्थिती होण्यास वेळ लागणार नाही, उत्तमपेरा, उत्तम उगवेल यांत शंकाच नाही. सर्वांभूती ईश्वर पाहण्याची दृष्टी थोडीफार का होईना देतां आली तरी खूप झाले अशा तर्हेचे “सामाजिक व्हॅलेंटाईन डे” वरचेवर साजरे झाल्यास बातमी निर्माण होण्यास ——– हातभार लागले.
मुलुंड (पूर्व)
१३-०२-२०११
— गुरुदास / सुरेश नाईक
Leave a Reply