उडून गेली दूर दूर तू
झेप घेउनी आकाशी
बघू लागलो चकीत होऊनी
पंखामधली भरारी कशी
नाजूक नाजूक पंखाना
आधार होता मायेचा
चिमुकल्या त्या हालचालींना
पायबंध तो भीतीचा
क्षणात आले बळ कोठून
विसरुनी गेलीस घरटे आपुले
बंधन तोडीत प्रेमाचे
आकाशासी कवटाळले
कधीतरी उडणे, आज उडाली
बघण्या साऱ्या जगताला
किलबिल करून वळून पहा
दाणे भरविल्या चोचीला
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply