नवीन लेखन...

वनस्पती आणि आनुवंशिक संकेत – झाडाचा जन्म – १

आपल्या घरांत चिंच, वाल, भोपळा, पारिजातक, गोकर्ण वगैरेंच्या बिया पडल्या असतात. त्यांना वर्षानुवर्षे अंकूर फुटत नाही. परंतू त्या झाडांचे सर्व आनुवंशिक गुणधर्म त्या बियांत, डीअेनअे, जनुके वगैरे आनुवंशिक तत्वाच्या घटकांच्या स्वरूपात संकेतावस्थेत बंदिस्त असतात. त्या झाडाचं खोड म्हणजे बुंधा कसा असावा, पानं, फुलं, फळं कशी असावीत, झाडाची अुंची किती असावी, झाडाचा आकार कसा असावा, फांद्या कशा असाव्यात, विस्तार कसा असावा, फुले केव्हा यावीत, फुलांचा आकार कसा असावा, पाकळ्यांचा आकार कसा असावा, त्यावर रंग कोणकोणते असावेत, ठिपके आणि रेषा वगैरे कुठे आणि कोणत्या रंगांचे असावेत, सुवास कोणता आणि किती असावा … सारं सारं त्या बी मध्ये अगदी लहानसहान बारकाव्यासहित बंदिस्त केलेलं असतं.

हे सर्व संकेत, निसर्गाच्या भाषेत, आज्ञावलीच्या स्वरूपात म्हणजे आनुवंशिक तत्वाच्या स्वरूपात या बियात बंदिस्त असतात. जोपर्यंत आपण या बिया जमिनीत पेरीत नाही आणि थोडं पाणी, सूर्यकिरणांची अुष्णता आणि वातावरणातील हवा (ऑक्सीजन) या सर्व बाबी अेकाच वेळी त्या बियांना मिळत नाहीत तोपर्यंत त्यांना अंकूर फुटत नाहीत.

पण अेकदा का, त्या बिया चांगल्या सुपिक जमिनीत पेरल्या, त्यास दररोज थोडं पाणी घातलं, त्या जागेवर चांगला सूर्यप्रकाश पडू दिला, हवा मिळू दिली तर चार पाच दिवसांत अशी कोणती नवी नवलाअी घडते की त्या बियांत अचानक जागृतावस्था येअून आनुवंशिक तत्वाच्या स्वरूपात बंदिस्त असलेले संकेत अुलगडायला लागतात, बंदिस्त आज्ञावली कार्यान्वित होते आणि त्या बियांना फोडून बाहेर आलेला अंकुर वाढू, लागतो, झाडाचा जन्म होतो, त्या अंकुराचा अेक भाग, मूळ म्हणून जमिनीखाली वाढू लागतो आणि अेक भाग खोड आणि पानं या स्वरूपात जमिनीच्या पृष्ठभागावर वाढू लागतो. याचा अर्थ असा की बियात बंदिस्त असलेले आनुवंशिक संकेत अुलगडायला लागण्याची प्रक्रिया सुरू झाली, सांकेतिक आज्ञावली कार्यान्वित झाली, म्हणजे झाडाचा जन्म झाला असं म्हणता येअील,

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..