रिता माझा पाळणा अन रीती माझी झोळी गं!
रीती माझी ओटी अन नशिबाची खोटी गं!
कुणा सांगू यातना, कुणा देवू दोष रं?
रित्या माझ्या काळजाला, कुणाची ओढ रं?
वांझ माझी ओटी त्यात माझा काय दोष रं?
आई माझ्या आत्म्यातील तिला नाही झोप रं!
पान्हा देऊ कुणा अन् कुणा देवू ऊब रं?
आईपणाची झाली खोटी, ममतेची दोरी गेली दुरं रं!
– श्वेता संकपाळ (१३/०७/२०२३)
Leave a Reply