रूणाचा ७-९ मीटर उंच वृक्ष असतो.ह्याची त्वचा धुरकट रंगाची व उभ्या चिरा असलेली असते.ह्याची पाने ८-१२ सेंमी लांब व तीन दल असलेली असतात.हे दल भालाकार असतात.ते चुरगळल्यावर उग्र वास येतो.ह्याची फुले ५-८ सेंमी लांब व्यास असलेली व पांढरट पिवळे काळपट तांबूस पुंकेसर असलेली सुगंधी असते.ह्याचे फळ २.५ सेंमी व्यासाचे लिंबा एवढे व पिकल्यावर लाल असते.
वरूण चवीला कडू,तुरट,तिखट व गोड असून उष्ण गुणाचा व हल्का व रूक्ष असून तो प्रभावाने रक्तदोषनाशक व अशमरीभेदक आहे.ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,पाने व मुळ.वरूण वातनाशक व कफनाशक आहे.
चला आता आपण वरूणाचे उपयोग जाणून घेऊयात:
१)वरूणाच्या पानांचा लेप संधिवातामध्ये वेदनाशामक म्हणून होतो.
२)वातरक्तामध्ये वरूणसालीचा काढा पोटात देतात.
३)शरीराची चरबी कमी करायला वरूणाच्या पानांची भाजी उपयुक्त आहे.
४)वरूण मुळाचा काढा मुतखडा फोडण्यास उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.गोवा
संपर्क:९९६०६९९७०४
©️ Dr Swati Anvekar
Leave a Reply