वरवर आनंद ती दाखवत होती
अंतरी दुःख अबोध खूप होती
तडजोड संसारात सदा मग
देहाची आहुती तिचीच होतं होती
न कळल्या वेदना तिच्या कुणाला
न कळली दुःख कुठलीच काही
रोज ती रडणारी व्याकुळ हरिणी
मायेत हरवुन अबोध दुःखद होती
न प्रेम,न माया कौतुक कसले नाही
रुक्ष संसारात गुरफटून मन मारुन होती
मन नव्हते जुळतं न भाव जुळले कधी
परी संसारात तडजोड सहनशील ती होती
संस्कार मनावर परंपरा रुढी
कर्तव्य तिला सारे समजावत होती
तरुणपण गेले तप्त विखरुन सारे
कुठवर दग्ध ती जळणार होती
न स्पर्श मायेचा न ओलावा कधी मनी
संसारात ती अबोल हरवुन मिटून होती
कित्येकजणी अशा निःशब्द असतात जन्मोजन्मी
स्त्री जन्म हीच शोकांतिका त्यांची असते खरी
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply