वाऱ्यावरती हाले डहाळी, जगाची पर्वा न करत,
सृष्टीच्या या साम्राज्यी,
डहाळ्या अशा अगणित,—
बहरलेल्या असती पानांनी,
त्यामुळेच फुलेही येत,
जोपासना करत त्यांची,
झाडे, वृक्ष उभे राहत,—–
दिनभर झळ सोसत उन्हाची,
झाड तिचे रक्षण करत,
जिथून फुटे हर एक डहाळी,
ठेवे त्यांना अगदी अलगद,—-
फळां-फुलांनी लगडलेली ,
मस्त -मौला दिसे डहाळी,
निसर्गाचेच छोटे मूल,
असूनही सतत झुके खाली,—-
एवढी ती होई समृद्ध,
तरी असते किती निरंहकारी,
थोडे तिच्याकडून शिक,
मानवा तू किती बेदरकारी,—-
एवढे सगळे भरभरून,
मिळूनही ती नतमस्तक होई,
तू मात्र ताठा मिरवत,
स्वतःचे गुणगान करत राही,—
झाडे, लता, वेली, वृक्ष,
निसर्गाचीच सारी संपत्ती,
हरेक घटक भासतसे यक्ष,
माणसाची मात्र जाण कोती—
माणसां, थोडा विचार कर,
लीन किती होतसे डहाळी, विनम्रतेचाच तिचा गुण,
सदैव तिला संपन्न करी,—!!!
©️ हिमगौरी कर्वे.
Leave a Reply