संस्कृतचे गाढे अभ्यासक, ‘शारदा ज्ञानपीठम्’चे संस्थापक आणि ‘शारदा’चे संपादक वसंत गाडगीळ यांचा जन्म. ८ सप्टेंबर रोजी झाला.
पंडित वसंत गाडगीळ हे संस्कृतचे गाढे अभ्यासक असून पुण्यात गेली अनेक वर्षे शारदा हे संस्कृत मासिक चालवतात.तसेच ते शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक आहेत. पं. गाडगीळ हे गेली ७० वर्षे अखंडपणे संस्कृतमध्येच विचार-आचार तसेच जीवन जगले आहेत.
पं.वसंत गाडगीळ एक अवलिया माणूस आहे. त्यांचं जीवन एक चित्तथरारक कादंबरी आहे. वि. स. खांडेकरांचा लेखकू, वडिलांच्या भीतीनं त्यांचं कराचीकडे पलायन, स्वातंत्र्यांनतर त्यानी तिथं पाहिलेली हिंदूंची कत्तल, कराचीहून भारताकडे बोटीनं विनातिकीट प्रवास, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत विषयात पदवीपर्यंतचं अध्ययन, शारदा ज्ञानपीठाची स्थापना, संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी केलेला प्रयास. त्यासाठी अमेरिका, आफ्रिकेमध्ये अनेक वेळा प्रवास. हे सारं केवळ झपाटलेला माणूसच करू शकतो.
पं. वसंत गाडगीळ अनेक वर्ष पुण्यात ऋषीपंचमी जाहीररीत्या साजरी करतात. ८० वर्षांवरील तपस्वी, विद्वान, निरनिराळ्या क्षेत्रांत सातत्यानं विधायक कार्य करणाऱ्या पुण्यातील व पुण्याबाहेरील नामवंत व्यक्तींचा सत्कार करतात. तेथे आजही स्वागतपर भाषण संस्कृतमध्येच करतात. गेली ४६ वर्षं हा उपक्रम खंड न पडता ते आयोजित करतात.
सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या धार्मिक समारंभास तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद उपस्थित राहिले. संयोजकांनी कार्यक्रमासाठी हिंदू धर्मातील अनेक दिग्गजांना निमंत्रित केलं होतं व ते सर्व आनंदानं सहभागी झाले होते. पौरोहित्य करण्यासाठी संयोजकांनी महाराष्ट्रातून लक्ष्मणशास्त्रींना बोलावलं होतं. त्यांच्यासोबत पं. वसंत गाडगीळही समारंभाला गेलं होतं. धार्मिक समारंभात त्यांनी भागही घेतला. त्या दिवसापासून त्यांनी आपले भाषण संस्कृतमधूनच करण्याचा निश्चय केला.
तेव्हापासून सतत ६० वर्षं ते आपलं भाषण फक्त संस्कृतमध्येच करत आहेत. सतत ६० वर्षं त्यांनी हा उपक्रम केला म्हणून त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम २०१२ मध्ये आयोजित करण्यात आला होता. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. कार्यक्रम एमआयटीमध्ये होता. व्यासपीठावर मोदींच्या समवेत डॉ. वि. दा. कराड व मी होतो. आपल्या भाषणात मोदी म्हणाले, ‘वसंत गाडगीळांना त्यांच्या आईनं रांगायला न शिकविता एकदम पळायला शिकविलं असावं. कारण, हा माणूस आयुष्यात सतत या गावातून त्या गावात पळतच असतो.’ सभेत हशा पिकला.
मोदी म्हणाले ते खरंच आहे. पं. गाडगीळ, ज्यांना मी ‘नमो नम:’ म्हणतो, सतत कोणत्यातरी ध्येयानं, विशेषत: संस्कृतच्या प्रचारासाठी सतत पळत, धडपडत, झपाटल्याप्रमाणे फिरत असतात. पं.गाडगीळ हे ‘शिशूशाळांतून संस्कृत’ हा कार्यक्रम देशात व देशाबाहेर राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
२०२१ मध्ये शृंगेरी शारदापीठ, शंकराचार्य यांच्यावतीने पं. वसंतराव गाडगीळ यांचा संस्कृतमधील अतुलनीय योगदानाबद्दल गौरव करण्यात आले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply