‘सिंफनी झपाटा’ या ऑर्केस्ट्राचे शिल्पकार वसंत खेर यांचा जन्म २२ मे १९५२ रोजी झाला.
वसंत खेर हे व्यवसायाने टेक्सटाइल डिझायनर व इंटिरिअर डेकोरेटर होते. ज्येष्ठ संगीतकार शंकर जयकिशन यांच्याकडून प्रेरणा घेऊन खेर यांनी १९७६मध्ये ‘सिंफनी’ या आर्केस्ट्राची सुरुवात केली. या आर्केस्ट्राच्या कार्यक्रमाची संकल्पना व मांडणी त्यांचीच होती. याशिवाय वसंत खेर यांनी पाटर्नर, डॉ. तुम्हीसुद्धा, आमच्या या घरात आदी नाटकांच्या जाहिरातीही तयार केल्या. ‘मंगलगाणी, दंगलगाणी’, व ‘भले तरी देवू’ हा भक्तीरसपूर्ण कार्यक्रम याची त्यांनी निर्मिती केली. पु. ल. देशपांडे यांचे साहित्य, आचार्य अत्रे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूळ आवाजातील भाषणे कॅसेटच्या माध्यमातून त्यांनी रसिकांपर्यंत पोहोचविली. मराठमोळा झपाटा त्यांनी सुरू केला होता. त्यांनी संगीतकार वसंत प्रभू श्रद्धांजलीचा कार्यक्रम सादर केला होता. तसेच ‘झपाटा’ मासिक, दिवाळी अंक यासह त्यांनी विविध मासिकांतून विपुल लेखनही केले होते.
वसंत खेर यांचे २३ एप्रिल २०१२ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply