नवीन लेखन...

वसंत पंचमी – एक आनंदोत्सव

काल वसंत पंचमी होती, सकाळी  गल्लीत एके ठिकाणी सरस्वती पूजा होत होती. बर्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली, गाडीतून दिल्लीला परतत होतो. सकाळची वेळ होती. खिडकीतून बाहेर बघत होतो, सर्वत्र दूर दूर पर्यंत शेंतात पिवळ्या फुलांनी नटलेली  सरसों दिसत होती. अचानक धुक्याचा परदा चिरत सूर्य नारायणाने दर्शन दिले. सूर्याच्या सोनेरी प्रकाशात, धरती न्हाऊन निघाली. असे वाटले जणू धरतीमातेने सुर्वर्ण गालिचाच पांघरलेला आहे. ते अद्भुतरम्य, अस्मरणीय दृश्य पाहून रात्रभर  थंडीने कुडकुडनार्या प्रवासींचे चेहरे ही आनंदाने उजळून निघाले. एक प्रवासी बहुधा शेतकरी असावा, दृश्य पाहून म्हणाला, भाऊ, यालाच म्हणतात स्वर्ग, अशी जमीन कसायला मिळाली पाहिजे…घरी आल्यावर कळले, त्या दिवशी वसंत पंचमी होती. आज रविवार, बर्याच दिवसांनी  प्रात:स्मरणीय श्लोक गुणगुणला:

 कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती ।
करमूले तू गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥

श्वेत कमळावर विराजमान शुभ्रवेशधारी ज्ञान देवता, सरस्वतीची कृपा असेल, तर आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतकरी,शेतांत ही सोन पिकवितो, लक्ष्मी हातात येते.

सरस्वतीच्या कृपेने माया-मोहाचे पाश तुटतात आणि ज्ञानाचा आनंद ही प्राप्त होतो. 

 अशीच एक कथा आहे, १२व्या शतकांत दिल्लीत हजरत निजामुद्दीन औलीयांचे वास्तव्य होते. हजरत निजामुद्दीन औलिया यांचे त्यांच्या बहिणीच्या मुलावर अत्यंत स्नेह होता. पण युवावस्थेत पदार्पण करण्या आधीच त्या मुलाचे  निधन झाले. हजरत निजामुद्दीन यांना मुलाच्या  मृत्यचा अत्यंत आघात लागला. ते उदास राहू लागले, दिवसभर त्याचा मजारवर बसून राहायचे.  अमीर खुसरोला आपल्या गुरूची ही अवस्था पाहवेना.  एक दिवस सकाळी आपल्या मित्रांसोबत फिरायला जाता असताना त्यांना काही हिंदू पुरुष आणि स्त्रिया दिसल्या. सर्वांनी पीत वस्त्र आणि पिवळ्या रंगाच्या फुलांची आभूषणे धारण केली होती. नाचत गाजत वासंतिक गीत गात ते रस्त्यावरून जात होते.  अमीर खुसरोने त्यांना या बाबत विचारले. त्यांनी सांगितले, आज वसंत पंचमी आहे, सरसोंची पिवळी फुले ज्ञानदेवता सरस्वतीच्या चरणी अर्पण करून तिला प्रसन्न करणार आहोत.

खुसरोने ही विचार केला, त्यांचे गुरु उदास आहे, त्यांना ही प्रसन्न केले पहिजे. त्यांनी सरसोंची फुले आपल्या पगडीत लावली,  हिदू पुरुषांप्रमाणे पीत वस्त्र धारण केले, फुलांचा शृंगार केला. आपल्या काही सुफी मित्रांना आणि कव्वालाना सोबत घेतले, औलीयाला देण्या साठी, सरसो आणि टेसूच्या गुलदस्ता तैयार केला.  वासंतिक गीत गात, नाचत गाजत ते हजरत निजामुद्दीन औलिया समोर आले.  त्यांची विचित्र वेशभूषा आणि नाचगाणे पाहून औलीयाला हसू आले, त्यांची उदासी दूर झाली. आपले गुरु आनंदित झाले, हे पाहून देवीचे आभार मानण्यासाठी अमीर खुसरो यांनी आपल्या मित्रांसमवेत देवीच्या चरणी सरसोची फुले अर्पण केली.   त्या दिवसापासून निजामुद्दीन  औलीयाच्या दर्गाहावर  वसंत पंचमीचा उत्सव सुरु झाला.  आज ही  मुस्लीम   बांधव  पीतवस्त्र  धारण करून, नाचत गाजत  अमीर खुसरो  यांनी लिहलेली  वासंतिक गीत गात निजामुद्दीन  औलीयाच्या दरगाह वर जाऊन श्रद्धेने  पिवळी फुले त्यांच्या चरणी अर्पण करतात.  खरंच ज्ञानाच्या उजेडात मोह-पाश नष्ट होतात आणि  भक्ताला आनंदाची प्राप्ति होते.

 शेवटी आमिर ख़ुसरो यांचे एक वासन्तिक गीत:

सगन बिन फूल रही सरसों।

सगन बिन फूल रही सरसों।

अम्बवा फूटे, टेसू फूले, कोयल बोले डार-डार,

और गोरी करत सिंगार,

मलनियाँ गेंदवा ले आईं कर सों,

सगन बिन फूल रही सरसों।

तरह तरह के फूल खिलाए,

ले गेंदवा हाथन में आए।

निजामुदीन के दरवज़्ज़े पर,

आवन कह गए आशिक रंग,

और बीत गए बरसों।

सगन बिन फूल रही सरसों।

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..