माघ शुक्ल पंचमीला वसंत पंचमी असे नांव आहे. खरे पाहता चैत्र-वैशाख या महिन्यांत वसंत ऋतूचा काल आहे. परंतु माघ महिन्यात वसंत ऋतूचे आगमनाची चाहूल पूर्वी लागत असावी म्हणून पूर्वी या पंचमीला वसंतारंभाची तिथी मानीत असावे. पूर्वी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव होत असे.
या दिवशी कामदेव मदनाचा जन्म झाला असल्याने रती व कामदेव यांची पूजा करण्याची प्रथा आहे. दांपत्य जीवन सुख – समृद्धी मध्ये जावे यासाठी यांची पूजा केली जाते.
विद्याधर करंदीकर
Leave a Reply