MENU
नवीन लेखन...

वासंतिक झुळूक ….. फुलोरा

हैदराबादच्या आमच्या घराजवळच एक छोटीशी टेकडी आहे. त्यावर एक लहानसं गार्डन आहे. आम्ही रोज सकाळी इथे चालायला जातो. आज जरा अंमळ लवकरच गेलो. साडे सहाच्या थोडसं अगोदरच. वातावरण अति प्रसन्न होतेच पण आजचा सकाळचा वारा काही वेगळाच होता. त्यात असा एक सुखद गारवा होता की जो अंतर्मनाला फार सुंदर स्पर्श करत होता. एक तास झाला पण आज पाय निघत नव्हता. मग अजून थोडा वेळ बागेत बसून त्या वाऱ्याचा आनंद घेत राहिलो. आणि अचानक मनात वीज चमकावी तसं जाणवलं ….. अरे ही तर वासंतिक झुळूक ….. एखादया रंगलेल्या मंद रागाप्रमाणे अव्याहत वाहात होती आणि अवघा आसमंत प्रसन्न करीत होती …. फुलवत होती …. ख़रंच आज बागेतून जावंस वाटतच नव्हतं…. ऋतुरंग किती सुंदर असतात ….

अश्मयुगांतिल जर मी मानव असतों
आणिक त्याच्या डोळ्यांनी तुज बघतों
किती असुंदर असते मज जाणवले
गालांवरचे गुलाब उसने असले
जपुनि कोरिल्या या भुवया अन
हा लटका भ्रूभंग
फिक्कट ओठांवरचा कृत्रिम
आणि लाल हा रंग …..

बघतां बघतां
आणि अकस्मात
जाणिव गेली भेदुनि थर काळाचे
आठवणीवर लगटुनिया बसलेले ….

…. रानामधल्या झाडापरि तूं
उभी राहिलिस पुढतीं
शोषुनि घेसी खोल भूमिंतिल तूं हिरवे चैतन्य
फांद्यांच्या हातांनीं पिउनी मुसळधार पर्जन्य
स्पर्शें तुझिया गरम जाहलीं कानशिलें ग्रीष्माचीं
मीठींत तुझिया शमे हुडहुडी आणि आर्त शिशिराची
वसंत आला घेउनि हृदयीं आग ….

आणि लसलसे तुझ्या पोपटी पानांतुन अनुराग
हिरव्या चैतन्याचीं झालीं हिरवी हिरवी पानें
जीवन होतें उघडयावरचें उत्कट उघडें गाणे ….

–मंगेश पाडगावकर

(Copy right of the image lies with Prakash Pitkar…)

—  प्रकाश पिटकर
Image : Prakash Pitkar….

प्रकाश पिटकर
About प्रकाश पिटकर 43 Articles
मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..