तिच्या शरीरावरील जखमांच
दुःख सहज न दिसतं
देह विक्री करतांना मात्र
तीच मन रोज मरतं..
चारचौघीसरखं सामान्य जगणं
तिलाही नक्कीच हवं असतं
पांढरपेशा दुनियेत मात्र तीच
अस्तित्वही डागाळलेलं असतं..
ती ही असते एक सजीव स्त्री
हेच दुनियेत विसरल जातं
रोज नव्याने शरीर विकतांना
भावना मारणं नशिबी उरतं..
ती ही असते एक कोमल स्त्री
पण पुरुषी वासनेत माल असतो
ती करते धंदा देहाचा रोज पण
तो व्यवहार पापी पोटाचा असतो..
वासनेचा बाजार भरतो रोज
देहाचा होम तिच्या दाहक होतो
तिच्यामुळे कितीक वाचतात स्त्रिया
नाहीतर बलात्कार हा कुठल्याही स्त्रीवर
कधीही वासनिक भावनेत होऊ शकतो..
किंमत तिला नसते कधी
फक्त देहाचा मोल असतो
वाटते लाज कितिकेदा जेव्हा
कितीक स्त्रियांना तिचा भाव न कळतो..
असते ती पण एक स्त्री
फरक फक्त नशिबाचा असतो
तिच्या इच्छा भावना मनाचा बांध
रोज रात्री दुःखद असा त्या बाजरी मरतो..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply