आनंद दडला वस्तूमध्यें, सुप्त अशा त्या स्थितीत असे
सहवासाने आकर्षण ते, होऊन बाहेरी येत दिसे….१
प्रेम वाटते हर वस्तूचे, केवळ त्यातील आनंदाने
बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने…२
तोच लूटावा आनंद सदैव, अंवती भंवती वस्तूतला
दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला…३
जेव्हा कुणीतरी म्हणती, ईश्वर आहे अणू रेणूत
वस्तूमधील आनंद बघतां हेच तत्त्व ते येई ध्यानात…४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply