थर्रर्र कापला नृपति
चकीत झाली सावित्री
ऐकून भयंकर भविष्याती
सत्यवानाच्या ।।१८।।
सावरोनी स्वतःशी
विचार करी मनासी
वदू लागली नारदासी
निश्चयीं स्वरानें ।।१९।।
प्रथम दर्शनी वरिले
मनोंमनीं पती मानिले
सर्वस्वी अर्पिण्या संकल्पले
कशी त्यागू मी त्याना ।।२०।।
काया वाचा मन
सत्यवाना अर्पून
पति ठायी त्याना वरुन
ह्रदयीं बसविले ।।२१।।
निवड करता पतीची
मनीं बसवुनी प्रतिमा त्याची
कल्पना न यावी दुजाची
हाच स्त्रीधर्म ।।२२।।
सप्त-पावली हा उपचार
होण्या सर्व जगजाहीर
धार्मिक विधी एक प्रकार
राहिला असे ।।२३।।
स्त्रीचा असता हा धर्म
कां सुचविता अधर्म
सांगा यातूनीच मार्ग
सावित्री विनवी नारदासी ।।२४।।
पतिव्रता ही श्रेष्ठ शक्ति
करोनी पति भक्ति
ईश्वर मिळविण्याची युक्ती
सांगू लागले नारद ।।२५।।
पतिभक्ति करुन
तपसामर्थ्य येईल महान
तेच नेईल उद्धरुन
पावन होता प्रभू ।।२६।।
बघूनी सावित्रीचा निश्चय
नारद आनंदी होय
आशिर्वाद देऊनी जाय
नारायण नाम घेत ।।२७।।
दृढ निश्चयाची शक्ति
सावित्रीस चेतना देती
माहित असून भविष्याती
उडी घेई जीवनयज्ञांत ।।२८।।
राजकन्या सावित्री
सत्यवानासंगे वनाती
लग्न करोनी राहती
संसार करण्या ।।२९।।
पतीसी समजूनी देव
त्याचे ठायीं आदर भाव
मनीं बसवी त्यांचे नांव
अवरित ।।३०।।
नामात असते लय
लयांत एकाग्रता होय
एकाग्र मनी ईश्वरी भाव
परमेश्वर सान्नीध्याचा ।।३१।।
पति हाच परमेश्वर
न पूजे दुजा ईश्वर
सावित्री त्याचे चरणावर
अर्पण करी सेवा ।।३२।।
सेवेत असते तप
शक्तीचा तो दीप
प्रज्वलीत होईल आपोआप
तपः सामर्थ्य वाढता ।।३३।।
सोडूनी काळी काळाची
पर्वा नव्हती वेळेची
अंतरीक इच्छा समर्पणाची
पतीच्या अल्प अयुष्यी ।।३४।।
वर्षा अखेरचा दिवस भयाण
घेत विश्रांति सत्यवान
वटवृक्षाखाली होता झोपून
सावित्री देत मांडीचा आसरा ।।३५।।
Leave a Reply