इच्छा माझी व्हावे माता
सानिध्य मुलाचे मिळतां
एकटेपणाचा भाव न राहता
उर्वरीत जीवनामध्यें ।।५४।।
पाठलाग घेण्या सोडूनी
तथास्तू म्हटले यमानी
मान्य तिची विनंती करुनी
वर देई तिला ।।५५।।
तथास्तू म्हणतां क्षणी
धरती गेली हादरुनी
भयंकर विजा चमकोनी
निसर्ग उत्पात माजला ।।५६।।
मान्य केले मातृत्व
नसता जीवित पितृत्व
शक्य कसे हे अस्तित्व
चुक उमगली यमराजा ।।५७।।
निसर्गाच्या नियमाला
तथास्तूने धक्का दिला
नियतीचा डाव उलटला
सावित्रीच्या शक्तिनें ।।५८।।
जसा सुटावा बाण
तसा शब्द जाऊन
यमराज पेचांत पडून
हारला सावित्रीपूढे ।।५९।।
सोडून देई प्राणज्योत
सत्यवान जीवदान मिळत
अखंड सौभ्याग्यवती वरदान
मिळाले सावित्रीला ।।६०।।
वटवृक्षाखालती
पाऊनी सतीशक्ति
जीवदान मिळती
सत्यवाना ।।६१।।
ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला
स्त्रीया पूजती वटवृक्षाला
अखंड मिळण्या सौभाग्याला
सावित्रीप्रमाणे ।।६२।।
पतिपत्नीतील प्रेमभाव
समजोनी मनाचा ठाव
एकमेका आदरभाव
हीच दिर्घायुष्याची गुरु किल्ली ।।६३।।
।। शुभंभवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर
Leave a Reply