विचारांची उठूनी वादळे
अशांत होते चित्त सदा
आवर घालण्या चंचल मना
अपयशी झालो अनेकदां
विष्णतेच्या स्थितीमध्यें
नदीकांठच्या किनारीं गेलो
वटवृक्षाच्या छायेखालच्या
चौरस आसनावरी बसलो
डोळे मिटूनी शांत बसतां
अवचित घटना ती घडली
विचारांतले दुःख जावूनी
आनंदी भावना येऊं लागली
एक साधूजन ध्यान लावीत
बसत होता त्या आसनावरी
पवित्र्याची वलये फिरती
आसन दिसले रिकामें जरी
वातावरणाची ही किमया
अनुभवते ती प्रखरतेनें
शुद्ध अशुद्ध ते विचार येती
सभोवतालच्या जाणिवेने
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com
Leave a Reply