वाटेवरल्या वाटसरां,
भोवती घनगर्द सावली,
धरती माय धरे उरापोटी,
लेकुरे उदंड जाहली,–!!!
वाटेवरल्या वाटसरां,
इथे थंडगार पाणी,
समंजस ते गावकरी,
अन् सारी पर्यावरणप्रेमी,–!!!
वाटेवरल्या वाटसरां,
इथे सगळी हिरवाई,
प्रवासीही विश्रांती घेई,
जिथे हरतसे ऊनही,–!!!
वाटेवरल्या वाटसरां,
मनसोक्त ताव मारी,
भूक लागता थोडी,
विपुल रानमेवा वरी,–!!!
वाटेवरल्या वाटसरां,
निवांत या परिसरी,
ना गोंगाट कुठला,
ना कुठली गडबडही,–!!!
वाटेवरल्या वाटसरां,
प्रदूषण नाही इथे काही,
शांत प्रशांत वातावरणी,
निव्वळ निद्रा तू घेई,–!!!
वाटेवरल्या वाटसरां,
विस्तीर्ण इथे वृक्षराजी,
पसरली कंकणाकृती,
सकल या गावावरी,–!!!
वाटेवरल्या वाटसरां,
थंडगार हवा इथली,
डोंगर पहा संरक्षणी,
निसर्ग राजाची मेहरबानी,–!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply