वाटेवरील वळणावर वळण
तू घेऊ नको
ओल्या भावनेत डोकावून
तू थांबू नको
मनातल्या मनात मोहरुन
तू जाऊ नको
भाव व्याकुळ स्वप्नांत
तू येऊ नको
हृदयस्थ हृदयात जीव
तू लावू नको
आरक्त डोळ्यांत तुला
तू शोधू नको
शब्दातल्या शब्दांचे चांदणे
तू लेवू नको
मधाळ मधाचे जाळे
तू वेढू नको
भावनेतल्या भावनांचे भाव
तू व्यापू नको
स्पर्श मलमली होता
तू लाजू नको
लाजणाऱ्या लाज गाली
तू पाहू नको
गंधाळल्या वाटेवर त्या
तू दूर नको
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply