मी मुलांनो, वाट तुमची पहाते
वात्सल्य, ओघळूनी गहिवरते
जीव माझा, लेकरांत गुंतलेला
प्रतिक्षेत सारेच मी भुलूनी जाते
तुम्हावीण, मीच इथे एकटी
जडावलेले तनमन कातर होते
तुम्ही सारे पाहुण्यासारखे येता
काळजातुनी, मातृत्व पाझरते
अधीर व्याकुळ शीणली काया
तरीही, तुमच्यासाठी मी जगते
सुरकुतलेल्या या हातांनीही
जे जे तुम्हा आवडते ते ते करते
तुमचे येणे, माझे भाग्य सुखाचे
वृद्धत्वात अजुनी जगावेसे वाटते
नका विसरू कधी तुमच्या घराला
बालपण, जिथे पुन्हा परतूनी येते
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. ११४.
१४ – ४ – २०२२
Leave a Reply