जगभरात जातीयता, स्त्री-पुरुष असमानता, उच्च – नीच फरक दिसतो. भारतात त्याचे प्रमाण मोठे आहे. वर्णभेद, जातीभेदाची झळ विशिष्ट समाजाला बसत आली आहे. गौतम बुद्ध, महावीर, आद्य शंकराचार्य, बसवेश्वर, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, शाहू महाराज, विवेकानंद आदींनी भारतीय संस्कृतीला नवी ओळख देण्याचा प्रयत्न केला.
आपल्या धर्मग्रथांतून ऋषिमुनींच्या चांगल्या विचारांनुसार कर्म करावे, स्त्री-पुरुष समानता यावी, वर्णभेद, जातीयता नष्ट व्हावी व सर्व देश एकरूपाने राहावा, सांप्रदायिक मतभेद, वाद होऊ नयेत, या उद्देशाने अॅड. श्री. शंकर निकम यांनी ‘वेदांच्या वेदीवरून’चे लिखाण केले आहे.
वैदिक काळातील समता, वेदकर्ते सर्वजन, वेदकर्त्या ब्रह्मवादिनी स्त्रिया, प्राचीन काळापासून स्त्रियांचे अधिकार, स्त्रियांचे विशेष अधिकार, मनुस्मृती स्त्रियांबद्दल काय सांगते, वेदकाळापासून विधवांचे अधिकार, सती, देवदासी प्रथा, वेद – उपनिषदे व धर्म ग्रंथानुसार काही संज्ञांचे संदर्भ – अर्थ, जातीच्या निर्मितीची तकलादू कारणे, भारतीय संस्कृती प्रवाही ठेवणारे काही बंडखोर आदी प्रकरणांतून चारही वेदान्त काय आहे, हे समजते.
धार्मिक
ओमकार प्रकाशन
Pages: 392
Leave a Reply