नवीन लेखन...

वेगळा (कथा) भाग २

वेगळा – भाग २

जवळ जवळ पंधरा दिवस बाबूचा पाय हा बांधलेल्या अवस्थेतच होता, त्या काळात बायडा दोन तीन वेळा घरी येऊन त्याची विचारपूस करून गेली, ती घरी येई तेव्हा बाबू जागा असला तरी झोपेचे सोंग घेऊन नुसता पडून राही, मग ती त्याच्या आईकडे किंवा बहिणीकडे चौकशी करून निघून जाई, एक दिवस मात्र जेव्हा ती घरी आली तेव्हा बाबू खाटेवर चहा पीत बसला होता , तेव्हा त्याला कुठे तोंड लपवू अस झाल होत , पण आता तिच्याशी बोलण्या शिवाय काही पर्याय न्हवता.,

बायडा तो जागा आहे हे पाहून त्याच्या जवळ जाऊन बसली आणि त्याच्या दुखावलेल्या पायाला नकळत तिने हात लावला,

बाबू वैतागतच “मूर्ख आहेस का , अजून बरा झाला नाही माझा पाय ” अस म्हणून मुकाट्याने चहा पिऊ लागला.”

बायडा लगेच उठून जायला निघाली तितक्यात बाबू ची आई “थांब अग चहा घेऊन जा”

“नको नंतर यीन मी , आता कामाव उशीर हुतोय ” अस म्हणून घराबाहेर पडली सुद्धा.

आई ला बाबूच्या वागण्याचा खूप राग आला, पण तरीही आई त्याला काही बोलली नाही.

महिना झाला बाबूचा पाय आता पूर्णपणे बरा झाला होता आणि त्याच दैनदिन जग सुरु झाल होत.
बाबुला त्याची आई शाळेत जाताना रोज चार आणे देत असे , तीन आणे शाळेत जायला यायला , त्यावेळी बस ची तिकीट हि दिड आणा होती म्हणून तीन आणे प्रवासासाठी आणि उरलेला एक आणा मधल्या सुट्टीत खाऊ साठी , पण बाबू हा बस ने न जाता रोज पाई ये- जा करत असे , आणि त्याचे ते तीन आणे त्याच्या जवळच्या एक छोट्या डब्ब्यात साठवत असे, महिना अखेरीस जमा झालेल्या पैशातून तो स्वतःसाठी अतिरिक्त वाचनासाठी पुस्तक खरेदी करी , इतक्या लहान वायातच त्याला वाचनाची प्रचंड आवड होती,

त्या दिवशी शाळेला कसली तरी सुट्टी होती , बाबू नेहमी प्रमाणे घरा शेजारच्या पडलेल्या घराच्या ओसरीत काहीतरी वाचत बसला होता , वेळ दुपारची होती , आणि तितक्यात त्याला लगबगीने घरी जाणारी बायडा दिसली, तिला बघून त्याने न बघितल्या सारख केल., आणि काही वेळातच बायडा च्या घरातून जोरजोरात भांडणाचे आवाज येऊ लागले.,सगळी वस्ती तिथे जमा झाली.,बाबुला ती कलकल सहन होईना त्याने सरल पुस्तक काखेत मारून दत्त  मंदिराची वाट धरली , त्याला तिकडे जाऊन निवांत पुस्तक वाचायचं होत , वाचताना चांगले तीन-चार त्याचे सहज निघून गेले., घरी यायला निघाला तेव्हा संध्याकाळ झाकोळून रात्र व्हायला लागली होती., घरी येऊन बघतो तर काय बायडी त्याच्या घरात रडत , नाक पुसत बसलेली , आणि आई तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होती,

“तु काहीतरी खातेस का” आईने तिला विचारल.

“नग, घरला जाऊन कायतरी बनवावं लागल, कुनीबी काय खाल्ल नसल” अस म्हणून ती घरी निघून गेली.

“तू कुठे होतास इतका वेळ ,” आई ने बाबुला विचारल.

“दत्त मंदिरात वाचत बसलो होतो, हिला आता काय झाल रडायला.” बाबू ने आईला विचारल.

“बाबू , निदान आपल्याला काही माहित नसेल , तर आधी कारण तर विचारव”

“अग, मग तेच करतोय ना आई, ”

“हे अस , कुचक्या सारख”

“तुला , सांगायचं असेल तर सांग नाहीतर जाऊदे” बाबू बेफिकीरीत बोलला.

” आई पुढे काहीही बोलली नाही , बाबू ने पण काहीच विचारल नाही , पण तरीही त्याला राहून राहून त्या गोष्टीबद्दल कुतूहल मात्र वाटत होत.

शेवटी तो घराबाहेर पडला , इकडे तिकडे नजर मारली तेव्हा त्याला अशोक दिसला, त्याच्याच वर्गातला , बाबू ने त्याला जवळ बोलावलं , “काय रे दुपारी काय झाल , बायडीच्या घरी”त्याने अशोक ला विचारल.

अशोक ने आधी त्याला खालून वरून नीट पाहिला आणि बाबूला च प्रतिप्रश्न करत , “ का , रे आज अचानक अभ्यासातून वेळ काढून माझ्याशी बोलायचा वेळ कसा मिळाला.”

“काय अशोक , मी अभ्यासात जरी असलो , तरी तुला जाता येता हात तर दाखवत असतो ना” बाबू ने सारवासारव केली.

“होय, फक्त हातच दाखवत असतोस , बाकी कुठे काय करतोस “ अशोक अजूनही त्याच्या कडे साशंक नजरेनेच पाहत होता.

“अस काही नाही हा अशोक , तुला अभ्यासात काही जरी अडचण आली ना, कि तू मला विचारू शकतोस , मी करेल तुला मदत” बाबू ने अशोकला त्यातला त्यात काही बोलायचं म्हणून म्हंटलं.

“बघ हा , बाबू नंतर पलटी नको मारूस “ अशोक आपली खात्री करत बोलला,

“ अरे नाही तू काळजीच करू नको “ बाबू पण अशोक ला अगदी मनापासून आश्वासन दिल .

“चालेल , ठीक आहे उद्या शाळा सुटल्यावर आपण भेटू “ अस म्हणून अशोक निघून गेला त्याच्या वाटेने.

बाबू त्याच्या कडे पाहतच राहिला , कारण बाबू ला अशोक कडून जी माहिती अपेक्षित होती ती तर तो न सांगताच निघून गेला.

क्रमशः

— निशा राकेश गायकवाड

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..