अशोक सोबत झालेल्या त्या बोलण्यामुळे बाबू पुढचे काही दिवस अशोकला भेटलाच नाही ,
शाळेत जरी तो त्याला दिसला तरी तो त्याला टाळू लागला, एकटा शाळेत येऊ जाऊ लागला.
संध्याकाळ चा बराच वेळ दत्त मंदिरात घालवू लागला .त्या दिवसानंतर मात्र अशोक आणि आपल्यात खूप फरक आहे ,
त्याचे आणि आपले विचार हे खूप वेगळे आहेत, अशोक आपला मित्र कधीच होऊ शकत नाही ह्याची
जणू खात्रीच बाबुला वाटू लागली होतीं,
अशोक ने देखील कधी न कधी बाबू स्वतःहून त्याच्याशी बोलेल ह्याची वाट पाहू लागला ,
पण नंतर त्याचा संयम तुटला आणि त्याने बाबुला शाळेतून घरी जाताना अडवलं .
“बाबू, काय झालय तुला,तू बोलत का नाहीस माझ्याशी” अशोक जमेल तितक शांतपणे बोलू लागला.
“अशोक, मला नाही वाटत आपल जमेल”इतक बोलून बाबू त्याची वाट चालू लागला.
“वाटत नाही आपल जमेल , म्हणजे , तू काय बायको आहेस का माझी” अशोक चा सूर त्याच्या ही नकळत चढला.
“तस नाही अशोक, मला तुझ्या सोबत हे अस डोंगरावर येण, तिकडे बसून राहाण, नाही जमणार”
“अरे मग नको येऊ, जबरदस्ती नाहीये माझी, पण तू बोलत का नाहीयेस माझ्याशी”
“कारण माझी नाही इच्छा तुझ्याशी बोलायची”
“ते दिसतंय मला बाबू , म्हणूनच तर विचारतोय, तू का टाळतोय मला” अशोक पुन्हा शांत होत म्हणाला.
“कारण मी मूर्ख आहे ना, मला काहीच कळत नाही , आणि तुला जरा जास्तच कळत सगळ्यातलं,
हसतोस तू माझ्यावर बावळट समजतोस तू मला ” बाबू तावातावाने बोलू लागला.
अशोकला आता त्याची चूक समजली.कारण काहीहि झाल तरी अशोक बाबुला चांगला ओळखून होता,
त्याला बाबूच वाईट वाटल, त्याने त्याची क्षमा मागितली आणि मी पुन्हा अस आयुष्यात परत कधी करणार नाही ,
अस वचन त्याने बाबू ला दिल.
बाबू पण नंतर थोडा खुलला, कारण तो पण इतके दिवस एकटा राहून कंटाळला होता,
दोघांमधलं भांडण मिटल , एकमेकांकडे बघून ते प्रसन्न हसले.
दोघ पुन्हा डोंगरावर जरी जात नसले तरी जेव्हा केव्हा अशोक चे वडील तालुक्याच्या गावी जायचे तेव्हा अशोक
त्याच्या आईला काहीतरी थाप मारून बाबू सोबत रात्री , बाबू जिथे झोपायचा त्या जागी त्याच्या सोबतीला जाऊ लागला.
त्याच्या मधली मैत्री आता चांगल्या प्रकारे आणि सकारात्मक घट्ट होऊ लागली होती.
शाळेतून घरी येताना जाताना तर ते सोबत असायचेच त्याच बरोबर अशोक आणि बाबू ह्यांनी सोबत अनेक
हिंदी सिनेमे देखील बघितले.
मध्येच कधी लहर आली तर बाबू अशोक ला सरिता बद्दल विचारी , ती कशी आहे, तुम्ही भेटता की नाही? अशी चौकशी तो करी,
अशोक मात्र अजूनही बाबूला बायडा बद्दल आकर्षण आहे ती त्याला आवडते असाच समज ठेऊन होता,
पण त्याला बाबूला काही विचारायची हिम्मत होत नसे,
असच एकेदिवशी अशोक चे वडील तालुक्याच्या गावी गेले असताना अशोक बाबू ची सोबत म्हणून
त्याच्या नेहमी च्या जागी झोपायला गेला,
झोपण्या-आधी पोटातली पाण्याची टाकी रिकामी करावी म्हणून तो थोडा लांब झुडूपा आड जाऊन पुन्हा झोपायला येत
असतानाच त्याला नजरेत पडणार बायडा च घर दिसलं , तिच्या घरात त्यांच्याच वस्ती मधला अनिल नावाचा मुलगा
घूसताना त्याने पहिला , अनिल हा दारू पिणारा , उनाडक्या करणारा, थोडक्यात वाया गेलेला मुलगा होता ,
तो बायडाच्या घरात का घुसतोय आणि ते पण इतक्या रात्री त्याला काही ते पटेना त्याने ही गोष्ट बाबुला सांगितली ,
बाबू च्या डोळ्यावर प्रचंड झोप होती , त्याने जाऊदे आपल्याला काय करायचय झोप तू , तीच ती बघेल,
अस मोघम उत्तर देऊन कूस बदलली, अशोक ला बाबू च्या त्या वाक्याचा प्रचंड राग आला,
मूर्ख आहे का बाबू तो अनिल तिच्या घरात घुसलाय आणि हा इथे मस्त घोरात पडलाय , आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे म्हणून , तो उठतो आणि तावातावाने तिच्या घराकडे चालत जातो , आणि जोरजोरात तिच्या घरच दर वाजवू लागतो. आत बायडा आणि अनिल असे दोघेच असतात , बायडा घाईघाईत दरवाजा उघडते तर समोर हा अशोक,
“काय पाहिजे ,?” अस प्रश्नचिन्ह तोंडावर ठेऊन दरवाजा उघडते ,
“ तो घरात का आलाय तुझ्या “ अशोक तिला संशयी नजरेने विचारतो .
” कोण ? आणि तुला काय करायचय” बायडा च्या चेहऱ्यावर अजून प्रश्चचिन्हच असत.
“ मला काय करायचं म्हणजे , तू एका वेळी दोन दगडांवर पाय ठेऊन उभी राहणार काय” अशोक अजूनही रागात ,
“ ए , दगड , निघ इकडून , सरकला आहेस का जरा” बायडा पण आता चिडून बोलू लागते.
“ हो आम्ही सर्व दगड आणि तू एकटी शहाणी नाही नाही , दीड शहाणी” अशोक चा पारा अजून चढू लागतो.
“आम्ही म्हणजे , तू अजून कोणाबद्दल बोलतोयस” आता बायडा त्याला संशयी नजरेने विचारते.
“ कोण म्हणजे आता ओळख पण विसरलीस , कोण काय कोण मी बाबू बद्दल बोलतोय.” अशोक ला आता मात्र आपण काहीतरी
चुकीच बोलून गेलो हे जाणवलं.
कारण बाबू ने कधीच स्वतःहून आपण बायडा वर प्रेम करतो ,हे अशोक ला ह्या आधी कधीही सांगतलेल न्हवत.
बाबू च नाव ऐकताच आता इतका वेळ आत लपून बसलेला अनिल आता बाहेर येतो .
— निशा राकेश गायकवाड.
Leave a Reply