नवीन लेखन...

वेगळा (कथा) भाग ७

बस ५० ते ६० किलोमीटर वेगाने पळत जरी असली तरी, बाबू च हृदय मात्र  १०० च्या पुढे पळत होत, पाऊस रिप रिप करू लागला होता , घाई गडबडीत छत्री , रेनकोट काहीच सोबत घेतलं न्हवत ,आपण काय करायला जातोय, त्याचा  काय परिणाम होईल, ह्याची जाणीव आणि त्यातून उत्पन्न होणारी भीती त्याच्या मनाला त्रास देत होती , पण तरीही तो मागे हाटत  न्हवता , का ?ह्याचं त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटत होत , एकदाच वाकड आल, पावसाने आता भलताच जोर धरला होता , वाकड तर खूप मोठ होत आता पुढे काय करायचं नेमक  तीच घर आपल्याला  कस  सापडणार , निघताना तर आपण मोठ्या उत्साहात निघालो आणि मुर्खा सारखा तिचा पत्ताही माहित नसताना तिच्या गावात आलोय , ह्या पावसाला पण आताच वेळ मिळाली होती कोसळायला ,

शी …हे दप्त्तर आपण का सोबत आणलंय, अशोक कडे द्याव अस का नाही सुचल आपल्याला , मुळात आपण असे कोणत्या ठाम विचारावर

आलोय हे समजत नाहीये काय कराव काहीही कळत न्हवत. तो हताशपणे एसटी थांब्याच्या नजीक चहाच्या टपरीवर च्या आडोश्याला उभा होता , इथे तिथे शोधक नजरेने आसपास चा परिसर न्हाहळू लागला . कदाचित त्याला बायडा दिसेल अश्या खोट्या आशेवर तो चलबिचल होत  होता .

त्याचवेळेस एक जर्जर झालेली म्हातारी त्याच्यापाशी आली .थंडी ने थरथरत होती ”ये लेकरा , एक कप चहा दे कि घेऊन” थकलेल्या स्वरात बाबूला म्हणाली.

बाबू कडे जास्त पैसे न्हवते , परतीच्या प्रवासाचे पैसे बाजूला काढून उरलेल्या पैशातून म्हातारीला चहा घेऊन दिला.

म्हातारी त्याच्या शेजारी खाली बसून मन लाऊन चहा पिऊ लागली.

“कुठून आला हाईस तू , इकुडचा दिसत न्हाइस,” म्हातारी ने आपली जुजबी चौकशी केली.

“ हो , आज्जी , मी इकडचा नाही , कुणाला तरी शोधत आलोय ” बाबू ने उत्तर दिल .

“आज्जी काल तुम्ही एक मुलगी , तिच्या वडिलांसोबत इथे थांबनार्या एस्टी तुन उतरताना पहिली का?” बाबू ने प्रयन्त करून पहिला.

“ काल , नाय बा , मी न्हवती इथ काल,” आज्जी ने उत्तर दिल.

बाबू हिस्मुसला , आणि पुन्हा तोंड पाडून वर आभाळाकड डोक करून पाहू लागला .

“ वाईच थांब जरा , येसू  अग ये येसू, हिकड ये ग बाय ” आज्जी कुणा येसूला हाक मारू लागली.

आज्जीने हाक मारताच एक ५-६ वर्षाची चुणचुणीत येसू जवळच एका डबक्यात पाणी उडवत खेळत होती , आज्जीची हाक ऐकताच  धावत आज्जी कड आली.

“काय ग आज्जे ,” येसू अर्ध लक्ष बाबू कडे देत म्हणाली.

“काल तू हितच भिक मागत व्हातीस न्हव ,” आज्जीबाई ने तिला विचारल.

“व्हय , इथच होती कि” येसू ने सांगितलं.

“तू काल एका  मुलीला तिच्या वडिलांसोबत ह्या एस्टीतून उतरताना बघितल का” बाबू ने पटकन येसू ला विचारून टाकल.

येसू वर आकाशाकडे पाहून विचार करू लागली.

“ काल, दुपारच्या वक्ताला येक माया फेक्षा हितकी मोठ्ठी पोरगी यका माणसा संगट उतरली होती गाडी तून” येसू ने तिच्या डोक्यावर हात उंच धरून ती मुलगी किती उंच होती हे सांगायचा प्रयत्न करीत होती.

“ती दोघ कुठे इथून कुठ गेली सांगू शकशील” बाबू ने प्रचंड आशेने  येसू ला विचारल.

“इथन पुढ मारुतीच्या मंदिरापास्न ह्या अंगाला वढ्याच्या पलिकड गेलती ती दोघ” येसू ने आपल्याला डाव्या हाता कडे इशारा करत बाबूला दिशा दाखवली.

“ तिकड कुणब्याच्या वस्तीत” म्हातारीने येसू ला विचारल.

“व्हय आज्जे”येसू ने उत्तर दिल.

म्हातारी बाबू ला पुन्हा एकदा न्हाहळू लागली.

बाबू तोवर तरातरा पावलं टाकीत  चालू लागला.

“ अर , खुट चाल्लाल येSSS पोरा , थिकड वढ्या ला आता मोप पाणी लागल असल, तुला न्हाई जाता यायचं” आज्जी जीवाच्या आकांताने बाबूला हाका मारू लागली .पण तिचे शब्द हे पावसाच्या पाण्यात मिसळून गेले , ते बाबू पर्यंत पोहोचलेच नाहीत,

मारूतीच मंदिर लागताच त्याला समोर दुथळी भरून वाहणारा ओढ दिसला, ते पाहून बाबू चा जीवच दडपला , त्याला अजिबात पोहोता येत न्हवत , काय कराव हा एक च क्षण विचार त्याच्या मनात आला आणि त्या नंतर मात्र कसलीही पर्वा न करता तो ओढ्याच्या दिशेने चालू लागला , सुरुवातीला त्याच्या गुडघ्या पर्यंत असलेल पाणी ते काही अंतरातच त्याच्या नका तोंडात जाऊ लागल , त्याला श्वासही घेता येईना , आणि पाणी भरपूर वेगाने येत असल्याने त्या पाण्यातून त्याला चालता ही येईना , पण तरीही तो घाबरून मागे वळत न्हवता , झपाटल्या सारखा जणू त्या वाह्ण्यार्या पाण्याशी दोन हात करत तो पलीकडे मार्गक्रमण करीत होता , तब्बल तीस मिनिटाची लढाई जिंकून तो एकदाचा काठा वर आला, प्रंचड थकवा आणि नका तोंडात पाणी गेल्या मुळे त्याचा जीव घाबराघुबरा झाला होता , तो तसाच काही वेळ  भर पावसात काठावर बसून होता , थकव्यामुळे त्याने डोळे मिटून घेतले आणि तितक्यात कडाक्याची वीज चमकली तसा तो भानावर आला आणि उठून कुणब्यांच्या वस्ती कडे चालू लागला त्या ओढ्यापासून वस्ती जास्त लांब न्हवती, तो प्रत्येक घरात सावकाश डोकावत पाहत चालत होता.

एका ४० – ४५ वर्षाच्या स्त्री ला शंका आली, हा असा शाळेतल्या गणवेशातला मुलगा भर पावसात कुणाला शोधत फिरतोय.

तिने त्याला हाक मारून घरात बोलावलं, तिच्या घरात बहुतेक तिची सासू असावी अशी एक बाई होती.

त्या स्त्रीने त्याला प्यायला पाणी दिल , डोक कोरड करायला टॉवेल दिला “कुठून आलास बाळा , कुणाला हुडकतोयस? “ ती स्त्री बहुतेक प्रेमळ असावी . कारण तिने त्याची खूप मायेने त्याची चौकशी केली , त्या उलट तिची सासू त्याच्या कडे फक्त एकटक खालून वर नुसती बघत होती,

“नाव काय  लेकरा तुझ” त्या स्त्रीने बाबू ला विचारल.

” बाबू “ त्याने चाचरत उत्तर दिल.

“अर शाळला जातूस न्हव मग शाळेतल नाव काय “, त्यावर बाबू ने जीभ चावली आणि पटकन “रामचंद्र कांबळे”

“अर व्वा , नावात राम हाय कि तुझ्या” त्या स्त्रीने लगेचच प्रतिक्रिया दिली.

“कांबळे” तिच्या सासू ने तो एकच शब्द उच्चारला, आणि तोंड फिरवून बसली. पुन्हा त्त्याच्या कडे तिने पाहिलं देखील नाही.

बाबू ला काही समजलच  नाही ,

“ कितवीत हाईस” अस त्या स्त्रीने पुन्हा बाबुला विचारल.

“नववीत “

“इथ कुणाला शोधुतुयास तू ,”

“काकी , इथे कोणी बायडा नावाची मुलगी आलेय का राहायला तिच्या मावशी कडे  “ बाबू ने काय होईल ते होईल अस मनाशी ठरवून विचारल.

“बायडा, तू सरीच्या भाचीला शोद्तोय्स व्हय” तिने तत्काळ विचारल.

“सरी…. कोण मला माहित नाही , पण बायडा कालच आली इथ”

“व्हय कालच आली, पण तू ….” अस म्हणून ती स्त्री थांबली आणि काहीतरी कळल्या सारख करत  बाबू कडे नुसती पाहू लागली.

“ती कुठे राहते , तीच घर मला दाखवाल का “ बाबू ने विचारल.

“दाखवते की , पण ती आता तिच्या मावशी संगट रानात गेली असल , भेटायची न्हाय तुला”

बाबुला पुढे काय बोलाव हे सुचेना , तो तसाच काही वेळ जमिनीकडे पाहत बसून राहिला

त्या स्त्रीने त्याला एका कपात गरमागरम चहा दिला ,

चहा संपल्यावर बाबू जायला उठला ,

“आर, थांब की , पाऊस तरी उघडू दे वाईच, “

पण बाबू काही थांबला नाही ,तो लगेचच त्या घरातून बाहेर पडला ,

घरी यायला संध्याकाळ उलटून गेली होती , पाऊस असल्या करणान नेमकी बाबू ची परतीची गाडी उशिरा होती, यायला त्याला रात्र झाली.

क्रमशः

— निशा राकेश गायकवाड.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..