हे पाणथळ जागी उगवणारे व नेहमी हिरवेगार असणारे १-२ मी उंचीचे क्षुप आहे.ह्याचे कंद जमीनीत असतात.आल्याच्या कंदा प्रमाणे ते वाढते.ह्याला ५-६ पर्व असतात जे मधल्या बोटा एवढे जाड व रोमयुक्त तांबूस रंगाचे व सुगंधी असतात.पाने हिरवी चमकदार व उसाच्या पानाप्रमाणे लांब,व कडा लाटा युक्त असतात.फुल पिवळट पांढरे मंजिरीस्वरूप असते.
वचा चवीला कडू तिखट असून हि उष्ण गुणाची हल्की,तीक्ष्ण,रूक्ष व प्रभाव मेध्य असलेली आहे.वचा कफवातनाशक व पित्तकर आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊया:
१)वेदना व सुज ह्यात वेखंडाचा लेप करतात.
२)लहान मुलांमध्ये वेखंड मेध्य कार्य करते अर्थात बुद्धिची ग्रहण व स्मरणशक्ती सुधारते.
३)मानसिक आजारात वेखंड हे तुप अथवा मधासह देतात.
४)खोकला,दमा ह्यात वेखंड सैंधव व कोमट पाण्यासह दिल्याने उल्टीतून कफ बाहेर पडतो.
५)वेखंड कृमीनाशक म्हणून देखील उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply