नवीन लेखन...

वेरा लीग —दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

वेरा लीचा जन्म 17 मार्च 1903 रोजी leeds इंग्लंड येथे झाला. तिचे मूळचे  नाव वेरा ग्लास पण तिला लहानपणीच एच इगन लीग ह्या रेसकोर्सच्या घोड्याना ट्रेनिंग देणाऱ्या माणसाने दत्तक घेतले त्यामुळे ती वेरा लीग झाली. तिचे लहानपण मेसन लिफि ह्या घोड्यांच्या तबेलयांच्या आसपास गेले. लहानपणी तिला मोठे झाल्यावर जॉकी बनायचे होते.पुढे ती रेसिंगच्या दुनियेतून फॅशन डिझाईनच्या दुनियेत गेली. 1927 मध्ये तिने दोन मैत्रिणीसोबत व्यवसाय सुरू केला. दुसऱ्या महायुद्धा आधी ती बड्या लोकांच्या वर्तुळात वावरू लागली. 1940 मध्ये जेव्हा पॅरिसचा पाडाव झाला तेव्हा ती एम चार्ल्स या पोर्तुगीज चित्रपट निर्मात्याकडे गेली. त्याच्या मदतीने तिला इंग्लंडला जायचे होते.त्यासाठी ती भूमिगत झाली आणि 1942 ला स्पेनला गेली. पण स्पेन सरकारने तिला मिरानडा एब्रो कॅम्पमध्ये नजरबंद केले.

ब्रिटिश एमबसिने प्रयत्न केल्यावर तिची सुटका झाली आणि ती व्हाया जिब्राल्टर इंग्लंडला पोहोचली. तिला तातडीने स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव  गुप्तहेर संघटनेने तिला दाखल करून घेतले तिने एम चार्ल्स या निर्मात्याबरोबर झालेले कॉन्ट्रॅक्ट मोडले.तिच्या शिक्षका मते ती अतिशय चपळ ,आत्मविश्वासी व प्रसन्न व्यक्तिमत्वाची, धाडसी कामासाठी परिपूर्ण  होती. ती नकाशे व डायग्राम वाचण्यात तरबेज होती. तिची बोटे अतिशय वेगात चालत. ती वायर्स आणि चारजर्स सह फिडलिंग चे काम पटपट व नीटनेटके करीत असे.ती आधी फॅशन डिझायनर होती म्हणून तिला खाकी गणवेश आवडत नसे. 40 व्या वर्षी ती फर्स्ट एड नर्सिंग खात्यात आली. 14 मे 1943 ला ती एका एअरक्राफ्ट मधून टोउर शहाराजवळ रात्री अतिशय गुप्तपणे उतरली.तिचे सांकेतिक नाव  सीमोन होते.ती वेगवेगळ्या नावाने वावरत होती लंडनमध्ये अलमोनर,  तर फ्रांस मध्ये सुझन नावाने वावरत होती. ती आलीशान सिक्सटिन एरोंडिसमेंट या अपार्टमेंट मध्ये राहू लागली.आणि आपल्या एजंटना वेगवेगळ्या कॅफे मध्ये भेटू लागली.

पॅरिस जर्मनीच्या ताब्यात विलक्षण शांत होते आणि अनेकांना एकांतात त्रास सहन करावा लागत होता. मानसिक तणाव  असूनही पूर्वीप्रमाणेच जीवन चालू  होते.वेरा आपला जास्तीत जास्त वेळ एसओई एजंट सोबत घालवू लागली. 30 ऑक्टोबर 1943 ला तिला अटक करण्यात आली. एजंट रॉजर बरडेटने धोका दिला आणि टीमचे  नेटवर्क उद्ध्वस्त झाले.तिला फ्रेंनसस तुरुंगात नेण्यात आले. तिचे नाव सुझन केवन असे नोंदवण्यात आले. आणि 410 नंबरच्या कोठडीत डांबण्यात आले.तिला प्रशिक्षणात शिकवण्यात आले होते की आपल्या साथीदारासह  48 तासात कुठलाही परिसर रिकामा करणे किंवा पुरावे नष्ट करता यावेत जे तिच्याकडून मिळवले जाऊ शकतात. पण जर्मनांना तिच्याबद्दल बहुतेक माहिती होते. 13 मे 1944 मध्ये तिला पॅरिसला हलवले 6 जुलै 1944 ला तिला यातनातळा वर हलवण्यात आले.त्याच दिवशी तिला विषारी इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले आणि गुंगीतच मारले. युद्ध संपल्यावर डॉक्टरला पांच वर्षांचा तुरुंगवास सुनावला त्याच वेळी दुसऱ्या खटल्यात फाशी सुनावून त्याच दिवशी फासावर देण्यात आले. .

–रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 87 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..